आज हसत असलेला माणूस उद्या तसाच दिसेल याची शाश्वती नसते. तो उद्या आपल्यातच असेल याचीही कोणी खात्री देऊ शकत नाही. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याबरोबर देखील असंच काहीस घडलं होतं. जेवणाच्या टेबलावर त्याचा जीव गेला. त्याच्या जाण्याने त्याच्या बायकोला मोठा धक्का बसलाच पण इंडस्ट्री देखील हादरली.
advertisement
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे सुशांत रे. अशी ही बनवा बनवी सिनेमात शंतनू ही भूमिका सुशांतने साकारली होती. शंतनु आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनेता सुशांत रे यानं फार लवकर या जगाचा निरोप घेतला. त्याचा मृत्यू अनेकांसाठी चटका लावणारा होता. अभिनेत्याच्या बायकोनं अनेक वर्षांनी त्याच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं होतं या उलगडा केला.
अभिनेता सुशांत रे याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता. त्याची बायको शांती प्रिया जी साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघांनी 1992 साली लग्न केलं. दोघांना दोन मुलही झाली. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. दोघेही अभिनय क्षेत्रात नाव कमावत होते. पण अचानक त्यांच्या संसाराला दृष्ट लागली आणि भरल्या संसारातून सुशांत निघून गेला. 2004 साली सुशांतचा त्याच्या राहत्या घरात त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यांदेखत मृत्यू झाला.
सुशांतची बायको अभिनेत्री शांती प्रिया स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "ती संध्याकाळाची वेळ होती. खूप धक्कादायक होती. जेवणाची वेळ होती. सुशांत माझ्या धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता. आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. त्याला अचानक उचकी लागली आणि त्याने डोकं खाली टेकवलं. तो अगदी सहज, कोणत्याही त्रासाशिवाय गेला. पण मी ते कधीच विसरू शकत नाही."
प्रिया पुढे म्हणाला, "त्याला तसं कसं पाहू मला काहीच सुचत नव्हतं. मी काहीच करू शकत नव्हते. माझ्या असिस्टंटने त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. आमच्या वर एक डॉक्टर राहत होते त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला इंजेक्शन दिलं पण अखेर त्यांनी त्याला मृत घोषित केलं."
"मी तेव्हा स्तब्ध झाले, कसं व्यक्त व्हावं हे मला कळत नव्हतं. भावना व्यक्त कराव्यात की जबाबदारी घ्यावी हे मला कळत नव्हतं", असंही प्रियानं सांगितलं.