तर गोष्ट आहे 1980 सालची. प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारतात आल्यावर काय तर प्रिन्स यांनी बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार? अधिका-यांची लागलीच लगबग सुरू झाली आणि प्रिन्स चार्ल्स आपल्या ताफ्यासोबत राजकमल स्टुडिओत पोहोचले. या स्टुडिओत पद्मिनी कोल्हापुरे यांच्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या सिनेमाचं शूटींग सुरु होतं.
advertisement
वाचा-शिव ठाकरेला भेटून उत्कर्ष शिंदेची माऊली गेली भारावून ; म्हणाली, 'तुमच्या...'
चार्ल्स आलेत म्हटल्यावर पद्मिनी लगेच त्यांच्या स्वागतासाठी पोहोचल्या. आधी अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स चार्ल्स यांची आरतीचं ताट हातात घेऊन, त्यांना ओवाळून स्वागत केलं आणि नंतर पद्मिनी स्वागतासाठी पुढे आल्यात. पण हे काय? आधी त्यांनी प्रिन्सच्या गालाचं चुंबन घेतलं आणि नंतर त्यांच्या गळ्यात माळ घातली.
या प्रकरणाचर चर्चा होणारच होती. कारण त्यावेळी भारतातल्या अभिनेत्रीने किस करणं फार काही सामान्य बाब नव्हती. अगदी सिनेमातही किसचा सीन आला की, दिग्दर्शक दोन फुलं दाखवून पुढे सरकायचे. अशात पद्मिनींनी चार्ल्सच्या गालावर किस केला म्हटल्यावर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. प्रिन्स चार्ल्सचं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे तर अगदी ब्रिटनमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली होती.
पद्मिनी यांना आजही याचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीत त्या यावर बोलल्या होत्या. ‘त्या प्रकरणानंतर अनेक दिवस मला ऑकवर्ड फील व्हायचं. मी ब्रिटनला गेले तेव्हा अगदी इमिग्रेशन ऑफिसरने प्रिन्स चार्ल्सना किस करणाऱ्या तुम्हीच का? असं मला विचारलं होतं आणि ते ऐकून मला लाज वाटली होती, असं त्यांनी सांगितलं होतं.