मातीचा स्पर्श आणि ८०% महाराष्ट्राची ताकद!
'कांतारा'ने कर्नाटकमधील एका विशिष्ट भागातील लोककला जगासमोर आणली, तर 'दशावतार' कोकणातील परंपरेवर आधारित आहे. पण, 'गोंधळ'ची ताकद याहून मोठी आहे. गोंधळ ही महाराष्ट्रातील जवळपास ८० टक्के भागात साजरी होणारी आणि रुजलेली परंपरा आहे. त्यामुळे 'गोंधळ' चित्रपट थेट महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध आणि भावनात्मक वारसा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
'कांतारा' आणि 'दशावतार'च्या अभूतपूर्व यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या मूळ संस्कृतीशी जोडलेली आणि मातीचा स्पर्श असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच आवडते. 'गोंधळ' हाच वारसा पुढे नेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम पडद्यावर सादर करणार आहे.
'तुझे देखा तो...' वाजलं अन् घडलं खास; DDLJ च्या गाण्यांचे ब्रिटनचे पंतप्रधानही फॅन! VIDEO VIRAL
'गोंधळ'चा टिझर आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा आणि लोककला यांना आधुनिक सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे. टिझरमधून असे दिसते की, नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून ही कथा काहीतरी वेगळेच रहस्य उलगडणार आहे. ही काही सेकंदांची झलक पाहूनच चित्रपटाची भव्यता आणि तांत्रिक गुणवत्ता स्पष्ट होते.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर सांगतात, "आमचे उद्दिष्ट हेच होते की, महाराष्ट्रातील श्रद्धा, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब 'कांतारा'प्रमाणेच पडद्यावर जिवंत करायचे."
दावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाला संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. यात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.