डोहाळ जेवणाचे सुंदर फोटो व्हायरल
कुंजिका काळविंटच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खास क्षणासाठी कुंजिकाने हिरव्या रंगाची पारंपरिक साडी नेसली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. तिच्यासोबत तिचा नवरा निखिल काळविंटही उपस्थित होता.
झुम्मा चुम्मा दे दे! आफ्टर पार्टीनंतर कार्तिक आर्यनसोबत टेबलवर चढून नाचली अनन्या पांडे, VIDEO VIRAL
advertisement
लग्नाच्या १० वर्षांनी घरी येणार चिमुकला पाहुणा
कुंजिका आणि निखिल यांच्या लग्नाला तब्बल १० वर्षं पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे. हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा आणि आनंदाचा क्षण आहे. कुंजिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करते. आता लवकरच त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे, त्यामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.
‘शुभविवाह’ मालिकेमध्ये कुंजिका काळविंट महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ती फक्त मालिकेतच नाही, तर सोशल मीडियावरही तिने सेटवरील गमती-जमती आणि कामाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ती अनेकदा सहकलाकारांसोबत रील बनवूनही पोस्ट करताना दिसते. तिच्या या आनंदाच्या बातमीमुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.