TRENDING:

'मना'चे श्लोक'ला कोर्टाकडून हिरवा कंदील, मृण्मयी देशपांडेचा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज

Last Updated:

Mrunmayee Deshpande Manache Shlok : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा 'मना'चे श्लोक' हा सिनेमा थिएटरमध्ये ठरलेल्या दिवशी रिलीज झाला आहे. सिनेमाच्या नावावरून चांगलाच वादंग उठला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणाऱ्या काही मराठी सिनेमांपैकी मनाचे श्लोक हा एक सिनेमा. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला.  राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या 'मना'चे श्लोक' या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली होती. कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यानंतर मनाचे श्लोक हा सिनेमा रिलीज होणार की याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान कोर्टाकडून याचिकेवर सुनावणी झाली.
News18
News18
advertisement

उच्च न्यायालयाकडून 'मना'चे श्लोक' या सिनेमाच्या रिलीजला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. सिनेमाच्या टीमनं याबाबत जाहीर प्रसिद्धीपत्रक शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यात लिहिलंय, "माननीय उच्च न्यायालयाने 'मना' चे श्लोक या चित्रपटाच्या प्रदर्शन थांबवण्यासाठीच्या केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, चित्रपट प्रदशिंत करण्यासाठी स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही 'मना'चे श्लोक' चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो."

advertisement

हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका - टीम 

"गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत करत आहोत.  मना चे श्लोक या नावाचा चित्रपट येत असल्याचे सर्वांनाच खूप आधीपासून माहीत होते. मात्र, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचा अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासून सोशल मीडियावर नावाबाबत विरोधाचे मेसेजेस फिरू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण टीमला अनावश्यक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. घटनांचा क्रम बघता हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येते आणि हे दुर्दैवी आहे."

advertisement

'मना'चे श्लोक' नावाचा नेमका अर्थ काय?

चित्रपटामध्ये रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या कुठल्याही श्लोकाचा उल्लेख सुद्धा नाही. 'मना चे श्लोक हे शीर्षक - चित्रपटातील नायक व नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे. आम्ही सर्वजण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही.

advertisement

नावाशी आम्ही प्रामाणिक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पान सेंटरने पालटलं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला
सर्व पहा

आम्ही या नावाशी प्रामाणिक आहोत. आत्ता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी स्वतःच्या पायांवर भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, अशा कौटुंबिक सिनेमाचं स्वागत करण्याऐवजी कुठलीही माहिती न घेता, सर्वांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात आले हे निराशा जनक आहे. अखेर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की, जसे तुम्ही याआधी आम्हाला प्रेम दिले, तसेच यावेळीही चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावे. आणि मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न आणता या सिनेमाला आशीर्वाद आणि भरघोस प्रतिसाद द्यावा.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'मना'चे श्लोक'ला कोर्टाकडून हिरवा कंदील, मृण्मयी देशपांडेचा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल