'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात 'बिग बॉस' अभिजीतला फ्रीज करताना दिसणार आहेत. त्यामुळे निक्की त्याची मजा घेताना दिसत आहे. त्यानंतर पुढे 'बिग बॉस' देखील निक्कीची फिरकी घेताना दिसत आहेत. अभिजीतला 'बिग बॉस'ने फ्रिज केल्याने तो काहीही खाऊ शकत नाही. त्यामुळे 'बिग बॉस' निक्कीला म्हणत आहेत, "तू भरवू शकतेस". त्यावर निक्की नकार देते. निक्की म्हणते, "अख्खा सीझनभर सर्वांनी त्याला भरवलंच आहे". निक्की भरवत नसल्याने बिग बॉसने अभिजीतला रिलीज केलं.
advertisement
Bigg Boss Marathi 5: धनंजयने हात जोडून मागितली निक्कीची माफी, नेमकं काय घडलं?
दुसरीकडे 'बिग बॉस' धनंजयला म्हणत आहेत, "धनंजय काय बनवताय?". त्यावर धनंजय डाळ बनवत असल्याचं बिग बॉसला सांगतो. बिग बॉस पुढे म्हणतात, "आपली डाळ या घरात शिजते का?". वर्षा ताईंना बिग बॉस विचारतात, "धनंजयने जेवण बनवलं आहे.. काय विचार आहे?". त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात, "त्याचं सर्व तडकावालं असतं. त्यामुळे सगळ्याबाबतीत त्याला तडका लागतो". त्यावर 'बिग बॉस' विचारतात, "या तडक्यामुळे भडका उडेल का?". पुढे वर्षा ताई डीपी दादांचं कौतुक करताना दिसून येतात.
दरम्यान, घरात फॅमिली वीक सुरू असल्यामुळे घरात भावनिक वातावरण झालं आहे. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला जवळच्या माणसांना भेटून भावूक झाला. आता बिग बॉसचे अगदी काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोण जिंकणार याकडे लागलं आहे.