Bigg Boss Marathi 5: धनंजयने हात जोडून मागितली निक्कीची माफी, नेमकं काय घडलं?

Last Updated:

बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन चांगलाच गाजतोय. स्पर्धकांना तर घरात आहे घराच्या बाहेर सोशल मीडियावर एकच कल्ला केलाय. भांडण, वाद, राडे, मजा-मस्ती सतत पाहायला मिळत आहे.

धनंजयने हात जोडून मागितली निक्कीची माफी
धनंजयने हात जोडून मागितली निक्कीची माफी
मुंबई : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन चांगलाच गाजतोय. स्पर्धकांना तर घरात आहे घराच्या बाहेर सोशल मीडियावर एकच कल्ला केलाय. भांडण, वाद, राडे, मजा-मस्ती सतत पाहायला मिळत आहे. अशातच अनेकदा स्पर्धक एकमेकांविषयी अशा काही गोष्टी बोलतात ज्याने दुसऱ्याला हर्ट होतं. असाच काहीसा प्रकार धनंजय आणि निक्कीमध्ये झाला. त्यामुळे डीपी दादांनी निक्कीची हात जोडून माफी मागितली. याचा व्हिडिओही समोर आलाय जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक स्पर्धकाची फॅमिली येत आहे. धनंजय पोवारची फॅमिली आली तेव्हा त्याने घरच्यांना निक्कीची ज्या प्रकारे ओळख करून दिली ती निक्कीला अजिबात आवडली नाही. धनंजय निक्कीची वडिलांना ओळख करून देताना म्हटला, ''हे वादळ, आमच्या घरातलं.'' निक्कीला याचं वाईट वाटलं.
advertisement
निक्कीला वाईट वाटल्याचं धनंजयला समजलं तेव्हा त्याने निक्कीची हात जोडून माफी मागितली. समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की, निक्की धनंजयला बोलते, ''तुम्ही माझं दुसरं नाव घेऊन जी ओळख करून दिली ते मला बिलकूल आवडलं नाही.'' मग डीपी दादा म्हणतात, ''त्याच्याबद्दल खरंच सॉरी.'' अंकिता बोलली, ''मला तुला वाईट वाटलं म्हणून मी बोलणार होतो मगाशी तुला. माझं इंटेंशन वाईट नव्हतं. आणि मी पर्सनली तुला सॉरी म्हणायला येणार होतो.'' मी खरंच तुला हात जोडून माफी मागतो. खरंच अंतःकरणापासून मी त्या गोष्टीबद्दल माफी मागतो.
advertisement
advertisement
दरम्यान, घरात फॅमिली वीक सुरू असल्यामुळे घरात भावनिक वातावरण झालं आहे. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला जवळच्या माणसांना भेटून भावूक झाला. आता बिग बॉसचे अगदी काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोण जिंकणार याकडे लागलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: धनंजयने हात जोडून मागितली निक्कीची माफी, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement