TRENDING:

ना लूक्स, ना टॅलेंट, ना सेक्सी, पूजा भट्टसमोर आलिया 'पानी कम चाय'? सावत्र भावानेच केली अभिनेत्रीची पोलखोल

Last Updated:

Alia Bhatt vs Pooja Bhatt : राहुल भट्टने मुलाखतीत आलिया भट्टची तुलना पूजा भट्टशी करत तिला कमी लेखलं आहे. त्याने रणबीर कपूरवरही टिप्पणी केली. यानंतर भट्ट कुटुंबातील नातेसंबंध पुन्हा चर्चेत आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमधून तिच्या दमदार अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. आजच्या घडीला आलियाचे अनेक प्रशंसक आहेत. मात्र, तिच्या घरातील व्यक्तींना तिच्या कामाचे म्हणावे तितके कौतुक नाही. याचाच प्रत्यय सध्या एका मुलाखती दरम्यान आला आहे.
राहुल भट्टने मुलाखतीत आलिया भट्टची तुलना पूजा भट्टशी करत तिला कमी लेखलं आहे.
राहुल भट्टने मुलाखतीत आलिया भट्टची तुलना पूजा भट्टशी करत तिला कमी लेखलं आहे.
advertisement

भट्ट कुटुंबीय हे बॉलिवूडमधील एक चर्चेतील नाव. पण अलीकडे एका खासगी मुलाखतीत या कुटुंबातील सदस्याने जे वक्तव्य केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या घराचं कौटुंबिक नातेसंबंध चर्चेत आले आहेत. दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा आणि अभिनेत्री पूजा भट्टचा भाऊ राहुल भट्टने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सख्ख्या बहिणीचे कौतुक करताना, तिची तुलना सावत्र बहीण आलिया भट्टशी करत आलियाला कमी लेखलं आहे.

advertisement

"आलिया म्हणजे पाणी कमी चहा"

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत राहुल भट्ट म्हणाला, “जर कोणी मला विचारलं की भट्ट कुटुंबाची खरी वारसदार कोण आहे, तर मी एक क्षणही न दवडता ‘पूजा भट्ट’चं नाव घेईन. आलिया तिच्या समोर काहीच नाही, न लूक्समध्ये, न टॅलेंटमध्ये, न सेक्सीनेसमध्ये. पूजा ही सगळ्यांत टॅलेंटेड आहे”

Pahalgam Terrorist Attack : 'एकाही निरपराध्याला मारणे म्हणजे...' पहलगाम हल्ल्यावर सलमान खान भडकला

advertisement

राहुलची रणबीरवरही वादग्रस्त टिप्पणी

आलिया भट्टचा नवरा आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरवरही राहुलने आपलं मत व्यक्त करत म्हटलं, “तो चांगला वडील आहे, एवढंच मला महत्त्वाचं वाटतं. बाकी तो अभिनेता आहे का, एनिमल आहे का, कपूर आहे का, मला फरक पडत नाही. तो माझ्या बहिणीचा आदर करतो, आणि आपल्या मुलीवर प्रेम करतो, हीच चांगली गोष्ट आहे.”

advertisement

भट्ट कुटुंबातील नातेसंबंध पुन्हा चर्चेत

महेश भट्ट यांनी पहिली पत्नी किरण भट्टसोबत पूजा आणि राहुलला जन्म दिला, तर दुसऱ्या पत्नी सोनी राजदानसोबत आलिया आणि शाहीन यांना जन्म दिला. विशेष म्हणजे, दुसऱ्या पत्नीसोबत लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी इस्लाम स्वीकारला होता, जेणेकरून त्यांना पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागू नये.

राहुल भट्टचं हे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी राहुलला टीकेचं धनी केलं आहे, तर काहींनी त्याच्या स्पष्टवक्तेपणाचं स्वागतही केलं आहे. भट्ट कुटुंबाचा हा ‘घरचा वाद’ आता सार्वजनिक झाला असून, या विधानांवर आलिया किंवा पूजा यांची प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
ना लूक्स, ना टॅलेंट, ना सेक्सी, पूजा भट्टसमोर आलिया 'पानी कम चाय'? सावत्र भावानेच केली अभिनेत्रीची पोलखोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल