प्रियाच्या निधनानंतर सहकलाकारांनी सोशल मीडियावर भावुक आठवणी शेअर केल्या आहेत. अभिनेत्री राजश्री निकम हिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट विशेष चर्चेत आली. तिने प्रियासोबतचा 30 जानेवारी 2024 चा किस्सा सांगितला जो वाचून तुमचंही मन गहिवरून येईल.
4 वर्षात शंतनू मोघेवर दुःखाचा डोंगर, एकापाठोपाठ एक जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ
राजश्री निकम पोस्ट
advertisement
अंग वेडे…. गेल्या वर्षी तू बरी झाल्यावर आपण तुझ्या घरी भेटलो. तेव्हाचा हा फोटो. तू, मी, वॅन्डीने खूप गप्पा मारल्या, पोट दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकींना मिठी मारून रडलो… आणि तू म्हणाली होतीस now no looking back. वेडी…. My brave वेडी…. Group मध्ये आपण एकमेकांना वेडे म्हणतो.
त्या दिवशी ही वेडेपणा केला आपण. रात्री तू आम्हाला see off करायला खाली आलीस.. आणि समोरून लग्नाची वरात जात होती. आपण दोघींनी एकमेकींना नजरेने खुणवूनच विचारलं करायचा का वेडेपणा? वॅन्डी नको नको म्हणत असताना आपण दोघी त्या music वर जवळ जवळ 15 मिनिट रस्त्यावर मनसोक्त नाचलो… यार…. वॅन्डीने video करायला हवा होता…. तो दिवस होता 30 January 2024. नंतर भेटलोच नाही. केवळ तुझ्या हट्टापायी. न भेटणं हा तुझा वेडा हट्ट होता वेडे….. आज इच्छा असूनही तुला भेटायला येता येत नाही वाईट shooting करत असल्यामुळे, बघितलस म्हणून असे वेडे हट्ट करू नये वेडे….प्रियाऽऽऽऽऽऽऽऽ Love you वेडे.
दरम्यान, प्रिया मराठेने कॅन्सरशी झुंज देत असताना सोशल मीडिया वापरणं थांबवलं होतं, जास्त कोणाला भेटत नव्हती आणि कामातूनही ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रियाचं जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं आहे.