मालती वयाने लहान असली तरी तिच्या भविष्यासंदर्भात तिचे आई-वडील आता सजग झाले आहेत. नुकत्याच निक जोनसने एका टीव्ही शोमध्ये दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'द केली क्लार्कसन शो'मध्ये उपस्थित असलेल्या निककडे प्रश्न विचारण्यात आला की, "मालतीही तुमच्यासारखी शोबिजमध्ये एन्ट्री घेणार का?" यावर निकने दिलेलं उत्तर प्रचंड भावनिक होतं.
advertisement
निक म्हणाला, "मालतीने काय करायचं हे आम्ही नाही, तीच ठरवेल. आम्ही फक्त तिच्या पाठीशी उभे राहू. तिला गाणं आवडतं, संगीत ऐकणं आवडतं, पण याचा अर्थ असा नाही की तिने आमच्यासारखंच करिअर करावं."
प्रियांका आणि निक दोघांनीही आपापल्या करिअरमध्ये ग्लॅमर, संघर्ष, प्रसिद्धी आणि त्याचे दुष्परिणाम दोन्ही अनुभवल्याचे ते मोकळेपणाने कबूल करतात. निकने यावेळी सांगितलं की, "आम्ही दोघंही शोबिजमध्ये खूप काही अनुभवलं आहे. हे क्षेत्र जितकं तेजस्वी दिसतं, तितकंच कठीणही आहे. त्यामुळे मालतीला जर स्वतःचं काही वेगळं करायचं असेल, तर आम्ही तिला रोखणार नाही."
निकने हेही सांगितलं की मालतीला संगीताची आवड आहे. "ती छोट्याशा आवाजात गाणं गुणगुणते आणि आमचं म्हणणं ऐकते. पण या सगळ्याचा उपयोग तिला स्वतःचा मार्ग निवडायला व्हावा, हे आमचं उद्दिष्ट आहे."
प्रियांका आणि निक यांचे लग्न २०१८ मध्ये थाटात झालं. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्याने मीडिया आणि चाहत्यांच्या नजरा वेधल्या. त्यानंतर २०२२ मध्ये सरोगसीद्वारे मालतीचा जन्म झाला. प्रियंका आणि निक या दोघांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा जास्त प्रचार केला नाही, पण जेव्हा वेळ आली, तेव्हा त्यांनी आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या.