निक जोनासशी लग्न केल्यानंतर, प्रियंका चोप्रा आता परदेशात स्थायिक झाली आहे. परंतु ती अनेकदा कामासाठी आणि तिच्या पालकांच्या घरी भेट देण्यासाठी भारतात येते. ती जेव्हा जेव्हा भेट देते तेव्हा तिची स्टाइल अनेकदा लक्ष वेधून घेते.
advertisement
प्रियंका बव्हलगारी कार्यक्रमासाठी भारतात आली होती. परंतु नवरात्रीमुळे ती तिच्या नेहमीच्या देसी लूकमध्ये दुर्गा पंडालला पोहोचली. उत्तर मुंबईतील राणी मुखर्जी आणि काजोलच्या दुर्गा पंडाललामध्ये अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यात प्रियांकाच्या एन्ट्रीनं चार चांद लावले. प्रियांका तिथे फक्त काही मिनिटांसाठी होती आणि त्या काही मिनिटांत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियंका दुर्गा पंडालमध्ये येताच अयान मुखर्जीने तिचे स्वागत केले आणि तिला आत घेऊन गेला. त्यानंतर देसी गर्लने मुखर्जी कुटुंबासोबत फोटो काढले. तिने काजोलची बहीण तनिषा मुखर्जी आणि अयान मुखर्जीसोबतही पोज दिली.
प्रियांकाचा संस्कारी अंदाज
अष्टमीच्या निमित्ताने प्रियांका दुर्गा पंडालमध्ये देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली आणि तिथे तिचा देसी अवतार पुन्हा बाहेर आला. देवीच्या समोर जाताच प्रियांकानं डोक्यावर पदर घेतला. गुरूजींनी तिला देवीची ओटी दिली तेव्हा प्रियांकाने लगेचच आपला पदर पुढे केला आणि पदरात ओटी घेतली. देवीच्या पुढ्यात नम्रतेनं नतमस्तक झाली. प्रियांकावरचे संस्कार, तिची आपल्या मातीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
प्रियांकाचा देसी लुकबद्दल बोलायचं झाल्यास, प्रियंका चमकदार निळ्या सूटमध्ये आली होती. प्रियांकाने कपाळावर लाल टिकली आणि भांगात सिंदूर लावलं होतं. तिच्या देसी अवताराने चाहत्यांना भुरळ घातली.