पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत होता. त्यावेळी त्याच्या मागील सीटवर बसलेल्या एका दाम्पत्याने सिनेमाची स्टोरी सांगणे आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यामुळे तरुणाने त्यांना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि 'शांत बसा' अशी विनंती केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने तात्काळ तरुणाची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि जमिनीवर पाडले.
advertisement
पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं. यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अकिब जावेद निसार पटेल, व एक महिला यांच्या विरोधात चिंचवड पोलिसांत भारतीय न्याय संहिता 117 , 115, 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.