TRENDING:

'अब्बू'नंतर आता 'अम्मी', अथर्व सुदामेनंतर इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितचा Video Viral

Last Updated:

Danny Pandit Video : अथर्व सुदामेनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. काय आहे या व्हिडिओमध्ये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं गणेशोत्सवानिमित्तानं शेअर केलेल्या एका व्हिडीओनंतर बराच गदारोळ झाला. अथर्ववर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर तो व्हिडीओ डिलिट करण्यात आला. हिंदू -मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा अथर्वचा व्हिडीओ जरी डिलिट झाला असला तरी आता अथर्वचाच मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेट क्रिएटर्सनी या व्हिडीओ आणि डॅनीला सपोर्ट केला आहे. पाहूयात डॅनी पंडितचा व्हिडीओ नेमका आहे तरी काय.
News18
News18
advertisement

डॅनी पंडितच्या व्हिडीओमध्ये काय आहे?

अथर्व सुदामेनंतर डॅनी पंडितनं देखील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डॅनी आणि त्याचे मित्र मैत्रिणी गणपती बाप्पाची आरती करत आहेत. आरती केल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेल्या झोया नावाच्या मुलीला तिची आई हाक मारते. मुलगी पळत जाते. थोड्या वेळात हातात डिश घेऊन परत येते. डॅनी तिच्या हातातील डिश उघडतो त्यात बाप्पाच्या प्रसादासाठी बनवलेले उकडीचे मोदक असतात. डॅनी मुलीला विचारतो, 'आपने बनाया?' मुलगी म्हणते 'नही'. डॅनी विचारतो 'फिर किसने?' मुलगी म्हणते, 'अम्मीने'. यानंतर मुलीची अम्मी मागून येते. झोयाच्या अम्मीने बनवलेले मोदक सगळे मिळून खातात.

advertisement

( अथर्व सुदामे महिन्याला किती कमावतो? गणपतीच्या रीलमुळे वादात, पण याच रील्समधून करतो लाखोंची कमाई! )

कोणतेही डायलॉग न वापरता फक्त बोलक्या फ्रेम्स आणि एक्सप्रेशन्समधून खूप काही सांगून जाणारा हा व्हिडीओ आहे. 'बेस ऑन ट्रू इव्हेंट', असं म्हणत डॅनी पंडितनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. अब्बू नंतर आता  या व्हिडीओत अम्मी असली तरी संदेश मात्र एकच आहे.

advertisement

डॅनीच्या व्हिडीओला इन्फ्लुएर्न्सचा सपोर्ट 

डॅनी पंडितने शेअर केलेल्या या व्हिडीओवर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेट क्रिएटर्सच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अभिनेता आणि भाडिपाचा सर्वेसर्वा सारंग साठेनं हार्ट इमोजी शेअर केलेत. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलंय, डॅनी पंडित, यु आर किंग #ब्रदरहुड. बिग बॉस मराठी फेम कंटेट क्रिएटर धनंजय पोवारनं कौतुकास्पद, गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट केली आहे. 

advertisement

अथर्व सुदामेच्या व्हिडीओमध्ये काय होतं?

अथर्व सुदामेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका भाविकाच्या भूमिकेत आहे. तो एका गणपतीच्या कारखान्यात जातो. तिथे काम करत असलेला माणूस हा मुस्लिम असतो.अथर्व त्याच्याकडे मुर्ती घेणार नाही असं त्याला वाटतं. पण अर्थव त्याच्याकडून बाप्पाची मूर्ती घेणार असं सांगतो. अर्थव सुदामे म्हणतो, 'माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुर्माहीतसंच आपण वीट व्हावं जी वीट देवळातही लावली जाते आणि मशि‍दीमध्ये देखील. आपण फुल व्हावं जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा."

https://youtube.com/shorts/uPvdyP9c6y4?si=CuBfiG9itXT3CsnZ

अथर्वच्या या व्हिडीओनंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. "पुणेकरांची इज्जत काढली", "तू फक्त करमणूक कर. अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको", असं म्हणत अथर्ववर ब्राम्हण महासंघानं टीका केली होती. त्याना अनेक धमक्या देखील आल्या होत्या.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'अब्बू'नंतर आता 'अम्मी', अथर्व सुदामेनंतर इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितचा Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल