रेश्मा शिंदेने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिचा हा वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा
रेश्मा शिंदेसाठी ही पहिली वटपौर्णिमा असून, ज्येष्ठ पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी तिने आपल्या पती पवन सोनवणेसह वटसावित्रीचे व्रत केले. दोघांनीही मस्त तयार होऊन, पूजा करतानाचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये दिसतेय की या खास दिवशी पवनने पुन्हा एकदा रेश्माच्या गळ्यात मंगळसूत्र घातले.
advertisement
रेश्मा यांनी या दिवसासाठी पारंपरिक पोपटी रंगाची झगमगती पैठणी नेसली होती, नथही घातली यामुळे तिचा लूक अजून उठून दिसला. वडाला दोघांनी फेरे मारले. या क्षणांचा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, "माझी पहिली वटपौर्णिमा". चाहते व्हिडिओवर भरभरून लाइक्स आणि कमेंट करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 10, 2025 2:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Reshma Shinde : पोपटी पैठणी, नथ अन् मराठमोळा साज; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, पाहा VIDEO