मृणाल ठाकूरच्या इव्हेंटलमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात मृणाल ठाकूर सुंदर साडी नेसून ऑडियन्समध्ये बसली आहे. समोर स्टेजवर अचानक मोठ्या स्क्रिनवर अभिनेत्री रश्मिका आणि विजय यांचे प्रायव्हेट फोटो दिसतात. हे फोटो पाहून मृणाल चांगलीच हैराण होते. कार्यक्रमात दोघांचे प्रायव्हेट फोटो दाखवण्याचं काहीच कारण नव्हतं.
advertisement
पुढे कार्यक्रमाची होस्ट मृणालकडे बघून आश्चर्य व्यक्त करते. त्याआधी ती इव्हेंटच्या फोटोग्राफरला देखील हलका दम देताना दिसते. होस्टच्या रिअँक्शनवरून स्पष्ट कळत आहे की तिला हे सगळं माहिती आहे. फोटो पाहिल्यानंतर ती मृणालला तुला यावर काही बोलायचं आहे का असं विचारते. त्यावर मृणालला आधी काय रिअँक्शन देऊ हे सुचत नाही. त्यानंतर ती विचार करून "व्हेकेशन मोड ऑनठ, अशी कमेंट करते. त्यानंतर "नाइस स्कॉय, सेम स्काय" असंही म्हणते.
मृणाल ठाकूरच्या इव्हेंटमध्ये दाखवण्यात आलेला रश्मिका आणि विजयचा फोटो हा मालदीवमधील आहे. दोघे मालदीव्सच्या समुद्रात स्विमिंग करतानाचे हे फोटो आहेत. मध्यंतरी दोघांनी सेम लोकेशनवरील फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून रश्मिका आणि विजय रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.