सलमान खानची भावनिक पोस्ट
वरिंदर सिंग घुम्मण यांनी सलमान खानसोबत आगामी 'टायगर ३' या चित्रपटात काम केले होते. आपल्या सहकलाकाराच्या अशा अकाली निधनाने सलमान खानलाही धक्का बसला आहे. सलमानने वरिंदर घुम्मण यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "तुम्हाला मिस करू पाजी. तुमच्या आत्म्याला शांती लाभो." भाईजानच्या या पोस्टवर चाहतेही श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
advertisement
रिपोर्टनुसार, बायसेपच्या उपचारादरम्यान वरिंदर यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांना वाचवता आले नाही. ते छातीतील स्नायू फाटण्याच्या समस्येचा सामना करत होते.
फिटनेस आयकॉनचा प्रवास
वरिंदर घुम्मण त्यांच्या मजबूत शरीरयष्टीसाठी आणि दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध होते. २००९ मध्ये त्यांनी 'मिस्टर इंडिया' चा किताब जिंकला, तसेच 'मिस्टर एशिया' स्पर्धेत उपविजेता ठरले. या यशानंतर ते इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग (IFBB) प्रो कार्ड मिळवणारे पहिले भारतीय बॉडीबिल्डर ठरले. यामुळे भारताला जागतिक बॉडीबिल्डिंग सर्किटमध्ये स्थान मिळाले. त्यांनी आर्नोल्ड श्वार्झनेगर यांच्या ब्रँडचे आशियात प्रतिनिधित्वही केले होते. ते १२० किलोपेक्षा जास्त वजनी गटात स्पर्धा करायचे.
पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा ते अभिनेता
वरिंदर घुम्मण यांनी अभिनय क्षेत्रातही स्वतःची ओळख निर्माण केली. २०१२ मध्ये त्यांनी पंजाबी चित्रपट “कबड्डी वन्स मोअर” मधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. याशिवाय त्यांनी 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' आणि 'मरजावां' सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. वरिंदर यांचे वडील पंजाब पोलीसमध्ये अधिकारी होते. मूळचे गुरदासपूरचे असलेले वरिंदर जालंधरमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी कोच रणधीर हस्तीर यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. वरिंदर घुम्मण यांनी लाखों तरुणांना फिटनेसची प्रेरणा दिली.