नेहमीप्रमाणेच यावेळीही आराध्या स्टेजवर अभिनयाच्या बाबतीत तिची आई ऐश्वर्याला टक्कर देत आहे. व्हिडिओमध्ये, आराध्याचा तिच्या शाळेच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना तिचा आत्मविश्वास खूपच उंचावलेला दिसत आहे.
आराध्याला स्टेजवर परफॉर्म करताना पाहून ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही आपापल्या मोबाईलवरून तिचे शूटिंग करताना दिसत आहेत. या झलकमध्ये दोन्ही अभिनेत्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलीबद्दलचा अभिमान स्पष्टपणे दिसत आहे.
तर दुसरीकडे छोट्या अबरामचा परफॉर्मन्स पाहून शाहरुखही आपल्या मोबाईलमधून शुट प्रयत्न करताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात आपल्या लेकाचा परफॉर्मन्स पाहून शाहरुख खूप आनंदी दिसत आहे.
काही व्हिडिओंमध्ये शाहरुखच्या आजूबाजूला शाळकरी मुलेही दिसत आहेत, ज्यांच्यासोबत अभिनेता जोमाने डान्स करताना दिसत आहे.
परफॉर्मन्सनंतर ऐश्वर्या तिच्या लाडक्या लेकीला घेऊन बाहेर आली आणि कारमध्ये बसली. कारमध्ये बसल्यानंतर तिने आराध्याला मिठी मारून तिला किस केलं. याचवेळी आराध्या आणि ऐश्वर्याबरोबर अभिषेक बच्चन देखील कारमध्ये पुढे बसलेला दिसला. आराध्याचा डान्स पाहण्यासाठी आजोबा अमिताभ बच्चन देखील शाळेत आले होते.