TRENDING:

Dunki First Review : शाहरूखचा डंकी बॉलिवूडचा 'मास्टरपीस'; प्रेक्षक रिव्ह्यू काय म्हणतोय?

Last Updated:

डंकी या सिनेमातून एका आऊटस्टँडिंग देशभक्तीपर सिनमा तयार केल्याचं म्हणत चाहत्यांनी शाहरूख खान आणि राजकुमार हिरानी यांचं कौतुक केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 21 डिसेंबर : अभिनेता शाहरूख खानचा डंकी हा सिनेमा अखेर आज म्हणजेच 21 डिसेंबरला संपूर्ण देशात आणि विदेशात रिलीज झाला आहे. या सिनेमाची शाहरूखचे चाहते आतूरतेनं वाट पाहत होते. भारतात आणि विदेशातही शाहरूखची क्रेझ आहे. 2023वर्षाताली शाहरूखचा हा शेवटचा आणि तिसरा सिनेमा आहे. सिनेमाचं अँडवान्स बुकींग मोठ्या प्रमाणात झालं होतं. पठाण आणि जवानचा रेकॉर्ड डंकी तोडू शकणार का याकडे सर्वांचं लक्ष असताना डंकीला पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. चाहत्यांकडून डंकीचं आणि शाहरूखचं खूप कौतुक होतं आहे. शाहरूखचा डंकी हा सिनेमा बॉलिवूडचा मास्टरपीस असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. काय आहे ट्विटर रिव्ह्यू पाहूयात.
शाहरूख खान-डंकी रिव्ह्यू
शाहरूख खान-डंकी रिव्ह्यू
advertisement

डंकी या सिनेमातून एका आऊटस्टँडिंग देशभक्तीपर सिनमा तयार केल्याचं म्हणत चाहत्यांनी शाहरूख खान आणि राजकुमार हिरानी यांचं कौतुक केलं आहे. सिनेमात शाहरूख खानबरोबर अभिनेत्री तापसी पन्नी, विक्की कौशल,बोमन ईरानी, ​​​​अनिल ग्रोवर, विक्रम कोचर आणि दीया मिर्जा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा - Dunki- Salaar Advance Booking : शाहरूखवर भारी पडणार प्रभास? अँडवान्स बुकींगचा लक्षवेधी आकडा

advertisement

सिनेमाच्या पहिल्या हाफचा रिव्ह्यू देत एका चाहत्यानं लिहिलंय, "डंकीचा फर्स्ट हाफ पूर्ण झाला.डंकी ही एक भावनिक रोलर कोस्टर राइड आहे. तुम्ही एकाच वेळी हसाल आणि रडाल. विकी कौशलची आठवण येईल आणि हो 'हार्डी एक नमुना नाही' - तो किंग खान आहे."

advertisement

त्याचप्रमाणे अनेकांनी शाहरूखच्या एंट्रीची झलक शेअर करत दिग्दर्शक राजकुमारी हिरानी यांचे आभार मानले आहेत. तर आणखी एका प्रेक्षकानं रिव्ह्यू लिहित म्हटलंय, "राजकुमार हिरानी यांनी पुन्हा करून दाखवलं. उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट अभिनय हिंदी चित्रपटसृष्टीतील रत्नांमध्ये नेहमीच हा गणला जाईल. दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून, मला वाटत नाही की राजकुमार हिरानी यांच्यापेक्षा कोणीही चांगलं काम करू शकत नाही."

advertisement

शाहरूखचा सिनेमा आणि तो हाऊसफुल्ल होणार यात शंका नाही. भारतात सकाळी 5.55चा शो देखील हाऊसफुल्ल होता. शाहरूखचे चाहते कॉनिक Gaiety Galaxy जमले. तिथे त्यांनी सिनेमाच्या पोस्टरसमोर सेलिब्रेशन केलं.

शाहरूखच्या डंकी सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून U/A सर्टिफिकेट दिलं आहे. 2 तास 41 मिनिटांचा डंकी प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मित्रांचा एका भावनिक प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dunki First Review : शाहरूखचा डंकी बॉलिवूडचा 'मास्टरपीस'; प्रेक्षक रिव्ह्यू काय म्हणतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल