'शालू झोका दे गो मैना' हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 'लास्ट स्टॉप खांदा' या म्युझिकल सिनेमात हे गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लास्ट स्टॉप खांदा हा सिनेमा येत्या 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
( कोकणातील पोरांची लग्न का रखडली...! या दिवशी मिळणार उत्तर, 'कुर्ला टू वेंगुर्ला'चा धम्माल ट्रेलर )
advertisement
"लास्ट स्टॉप खांदा..." प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटात एका म्युझिकल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. अतिशय रंजक पद्धतीनं हा सिनेमा तयार करण्यात आलाय. त्यामुळेच प्रभाकर मोरे यांचं "शालू झोका दे गो मैना" हे गाणं खास ठरणार आहे. अभिनेते प्रभाकर मोरे आणि वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात धनश्री काडगावकर ही प्रभाकर मोरेंची शालू आहे.
श्रमेश बेटकर यांनी हे गाणं लिहिलं आहे. किशोर मोहिते यांचं संगीत आहे. तर आनंद शिंदे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे. प्रभाकर मोरे त्यांची हुक स्टेपही यात करताना दिसत आहेत. आता फक्त प्रभाकर मोरे नाही तर अवघा महाराष्ट्र "शालू झोका दे गो मैना" म्हणत त्यावर थिकरणार आहे यात शंका नाही.
"लास्ट स्टॉप खांदा..." प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट सिनेमात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश काप्रेकर , प्रियांका हांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे पाहुणे कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांचं आहे.