फराह खानच्या व्लॉगमध्ये राज कुंद्रा म्हणाला, "जेव्हा मी माझ्या कुटुंबाला सांगितलं की मी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला डेट करतोय, तेव्हा वडिलांची प्रतिक्रिया वेगळीच होती. त्यांनी लगेच म्हटलं, 'अरे, तो अभिनेत्रींच्या प्रेमात पडलाय का? त्या दारू पितात, सिगारेट ओढतात.' कुटुंब शिल्पाला घरची सून म्हणून योग्य समजत नव्हते."
बॉलिवूड ते बिझनेस क्वीन! शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती किती? कुठून कमावते इतका पैसा
advertisement
राजच्या आग्रहावरून घरच्यांनी शिल्पाला भेटायचं ठरवलं. आणि त्यानंतर सगळं बदललं. शिल्पाची साधेपणा, नम्र स्वभाव आणि संस्कार पाहून संपूर्ण कुटुंब तिच्यावर फिदा झालं. राज हसत म्हणाला, "त्यांनी तिला भेटल्यानंतर मला बाजूला जायला सांगितलं आणि म्हणाले, आता आम्ही तिच्यासोबत राहणार." शिल्पाही मजेत म्हणाली, “माझे सासरचे लोक मला राजपेक्षा जास्त प्रेम करतात.” राजनेही हे मान्य करत हसत उत्तर दिलं की खरंच असंच आहे.
दरम्यान, शिल्पा-राजची पहिली भेट 2007 मध्ये झाली होती. हळूहळू त्यांच्या नात्यात प्रेम फुललं आणि 22 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांनी विवाह केला. 2012 मध्ये मुलगा विवान आणि 2020 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी समीशा या दोघांचं आयुष्यात आगमन झालं. आजही हे स्टार कपल एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं असतं. शिल्पा आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे चर्चेत असते, तर राज आता निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवतोय.