फराह खानच्या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. त्यांचं नातं कसं होतं आणि लग्नानंतर किती अडचणींना तोंड द्यावं लागलं हे सांगितलं. राज कुंद्राचे कुटुंबीय दोघांच्या नात्याच्या विरोधात होते.
advertisement
राजचे वडील शिल्पासोबतच्या त्याच्या नात्यावर नाराज होते
राज कुंद्रा म्हणालास जेव्हा त्याच्या वडिलांना कळले की तो एका अभिनेत्रीला डेट करत आहे, याचा त्यांना खूप आनंद झाला. पण जेव्हा लग्नाचा प्रश्न आला तेव्हा त्याचे वडील नाराज झाले. त्यांना वाटले की ती अभिनेत्री दारू पित असेल आणि सिगारेट ओढत असेल. राजने सांगितले की त्याने त्याच्या वडिलांना समजावून सांगितले की शिल्पा शेट्टीबद्दल कोणतेही अनुमान काढण्यापूर्वी त्याने तिला एकदा भेटले पाहिजे आणि नंतर निर्णय घेतला पाहिजे.
राजचे कुटुंबीय शिल्पाला भेटले. तेव्हा त्यांना राजला बाजूला केलं आणि आता फक्त शिल्पाशी बोलणार असं सांगितलं. शिल्पाचे सासू सासरे तिच्यावर राजपेक्षा अधिक प्रेम करतात असं तिने सांगितलं.
राज कुंद्राने अलीकडेच चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आहे. त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका पंजाबी चित्रपटाने केली. तो मेहर या पंजाबी चित्रपटात दिसला ज्यामध्ये त्याच्या अभिनयाला चांगली पसंती मिळाली आहे. यासोबतच राज कुंद्राने त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पंजाबमधील पूरग्रस्तांना समर्पित केली आहे.
राज आणि शिल्पा सध्या 60 कोटींच्या फसवणूकीच्या केसमध्ये अडकले आहेत. दोघांना पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी केली आहे.