शिल्पा शेट्टीने अखेर या चर्चेला पूर्णविराम दिला. इंस्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडिओत ती म्हणाली, "मी बास्टियन बंद करत नाहीये, हे माझं वचन आहे. 4450 कॉल्स आले... इतकं प्रेम खरंच जाणवतंय. पण हे प्रेम विषारी बनवू नका. बास्टियन कुठेही जाणार नाहीये."
advertisement
शिल्पाने पुढे एक सरप्राईजही दिलं, "मी काहीतरी नवीन आणि खास आणतेय. माझ्या मुळांशी जोडत, तिने सांगितले की वांद्रे येथील आउटलेट आता अम्माकाई नावाच्या एका नवीन साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये बदलणार आहे, तर जुहूचे बॅस्टियन, बॅस्टियन बीच क्लब या नावाने स्थलांतर व रुपांतर होणार आहे.
2016 मध्ये सुरू झालेलं हे रेस्टॉरंट आज मुंबईतील सेलिब्रिटी आणि व्हीआयपींचं हँगआऊट स्पॉट आहे. दीपिका पदुकोणपासून ते रणबीर कपूरपर्यंत अनेक कलाकार येथे डिनर करताना दिसतात. शिल्पा शेट्टी सध्या अभिनयापेक्षा तिच्या व्यवसाय आणि रिअॅलिटी शोमध्ये जास्त सक्रिय आहे. ती सोनी टीव्हीवरील ‘सुपरस्टार डान्सर सीझन 5’ ची जज म्हणून दिसत आहे. अभिनय, व्यवसाय, कुटुंब या सगळ्याचा ताळमेळ घालत शिल्पा अजूनही चाहत्यांची फेव्हरेट स्टार ठरते.