दीप्तीनं पोस्टमध्ये लिहिलंय, 'माझं आयुष्य, माझा श्रेयस बरा होऊन घरी आला आहे. मी श्रेयसबरोबर नेहमी भांडायचे की विश्वास कोणावर ठेवायचा. पण आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. याचं उत्तर देव असा आहे. हे सगळं घडलं तेव्हा देव माझ्याबरोबर होता. यापुढे त्याच्या असण्यावर मी कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही.'
हेही वाचा - Shreyas Talpade : OTT प्लॅटफॉर्मचा मालक आहे श्रेयस तळपदे, पाहा किती आहे नेटवर्थ आणि लग्जरी कारचं कलेक्शन
advertisement
दीप्तीनं पुढे सगळ्यांचे आभार मानले. तिनं म्हटलंय, 'त्या सगळ्यांचे आज मी आभार मानते ज्यांनी त्या संध्याकाळी माझी मदत केली. मी मदतीसाठी एक हाक मारली पण 10 हात पुढे आले. श्रेयस कारमध्ये होता हे कोणालाही माहिती नव्हतं. आपण कोणाला मदत करतोय हे त्यांना माहिती नव्हतं तरीही ते माझ्यासाठी धावून आले. त्या दिवशी जे माझ्या मदतीला धावून आले ते देवाच्या रूपाने आले. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. मल आशा आहे मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील.'
दीप्तीनं पुढे लिहिलंय, 'मुंबई हे असं शहर आहे ज्या शहरानं आम्हाला कधीच एकटं सोलं नाही. मी आमचे मित्र मैत्रिणी, इंडस्ट्रीतील लोक या सगळ्यांचे आभार ज्यांनी आपली काम बाजूला ठेवून आम्हाला मदत केली, रुग्णालयातील डॉक्टर्सचे आभार ज्यांनी श्रेयसला वाचवलं. ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे आभार.'
श्रेयसला 14 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वेलकम 3चं शुटींग संपवून श्रेयस घरी आला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळेस दीप्तीनं त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात नेल्यानंतर श्रेयसवर अँन्जिओप्लॉस्टी करण्यात आल्याचं माहीती समोर आली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर श्रेयसच्या जीवाचा धोका कमी झाला असून तो सुखरूप घरी परतला आहे.