Shreyas Talpade : OTT प्लॅटफॉर्मचा मालक आहे श्रेयस तळपदे, पाहा किती आहे नेटवर्थ आणि लग्जरी कारचं कलेक्शन

Last Updated:

Shreyas Talpade Net Worth : श्रेयस तळपदे हा आज बॉलिवूडपासून तर मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. त्याने कोणत्याही गॉडफादर शिवाय फिल्मच्या दुनियेत आपली ओळख निर्माण केलीये.

श्रेयस तळपदे संपत्ती
श्रेयस तळपदे संपत्ती
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला गुरूवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयस शुटींगनंतर घरी परतला होता. यानंतर त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याची अँन्जिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयसच्या हार्टअटॅकची बातमी ऐकताच कलाविश्वात खळबळ उडाली. चाहत्यांसोबतच कलाकारांनी त्याच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली. दरम्यान आता त्याची बायको दिप्ती तळपदे हिने नवऱ्याची हेल्थ अपडेट दिली आहे. श्रेयसची तब्येत स्थिर आहे आणि लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल अशी माहिती दिप्तीने शेअर केली आहे.
श्रेयस तळपदेचे मराठी कला विश्वात तसेच बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. 'पुष्पा'मधील अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेसाठी हिंदी डबिंग केल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ आणखी वाढलीये. मात्र श्रेयस तळपदेला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. आज श्रेयस तळपदे हा हिंदी, मराठी आणि साऊथ सिनेमांमध्ये प्रचलित आहे. पण एक वेळ अशी होती की श्रेयसने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. एक काळ असा होता जेव्हा श्रेयस तळपदेकडे भाडे देण्यासाठी किंवा सँडविच घेण्यासाठीही पैसे नव्हते, पण आज त्याची कमाई करोडोंमध्ये आहे आणि त्याच्याकडे कोट्यवधी संपत्ती आहे. आज आपण त्याच्या नेटवर्थविषयी जाणून घेऊया.
advertisement
OTT प्लॅटफॉर्मचा मालक, एवढी आहे नेटवर्थ
श्रेयस तळपदे हा केवळ अभिनेताच नाही तर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. तो एक बिझनेसमनही आहे. श्रेयस तळपदे हा OTT प्लॅटफॉर्मचा मालकही आहे. सन 2021 मध्ये त्यांनी Nine Rasa नावाचा ओटीटी प्लॅटफॉर्म तयार केला होता. 'सीए नॉलेज'नुसार, श्रेयस तळपदेची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 2 ते 3 कोटी रुपये घेतो. तो बर्‍याच ब्रँड्सला एंडोर्स देखील करतो. त्यामधूनही त्याची चांगली कमाई होती.
advertisement
लक्झरी घर आणि टीव्ही शो फी
श्रेयस तळपदे यांचे मुंबईतील ओशिवरा येथेही आलिशान घर आहे, जे 4000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. याशिवाय त्यांचे वॉल्डॉर्फ इमारतीत दोन फ्लॅट्स आहेत. श्रेयस तळपदे हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये गणला जातो. मराठी टीव्हीवरील एका एपिसोडसाठी तो 40 हजार ते 50 हजार रुपये कमावतो.
advertisement
श्रेयस तळपदेचं कार कलेक्शन
श्रेयस तळपदेकडे आलिशान गाड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. यामध्ये मर्सिडीज-बेंझ आहे, होंडा अकॉर्ड, ऑडी क्यू7 आणि ऑडी A8L सारख्या कारचा समावेश आहे. यातील काहींची किंमत 1 कोटी रुपये तर काहींची 1.23 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/मनी/
Shreyas Talpade : OTT प्लॅटफॉर्मचा मालक आहे श्रेयस तळपदे, पाहा किती आहे नेटवर्थ आणि लग्जरी कारचं कलेक्शन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement