TRENDING:

Atharva Sudame : भय इथले संपत नाही! माफी, व्हिडीओ डिलीट अन् आता 4 दिवसांनंतर अथर्व सुदामेचा नवा VIDEO

Last Updated:

Atharva Sudame New Video After Controversy : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं गणपतीचा तो व्हिडीओ डिलिट केल्याच्या जवळपास 4 दिवसांनी नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पुण्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं गणेशोत्सवानिमित्तानं शेअर केलेल्या व्हिडीओवरून चांगलाच वाद निर्माण झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या अर्थवच्या व्हिडीओवर ब्राम्हण महासंघ तसंच अनेक राजकीय मंडळींनीही टीका केली. या टीकेनंतर अथर्वनं तो व्हिडीओ डिलिट केला. व्हिडीओ डिलिट केल्यानंतर त्याने माफी देखील मागितली. दरम्यान तो व्हिडीओ डिलिट केल्याच्या जवळपास 4 दिवसांनी अथर्वनं कमबॅक केलं आहे. अथर्वनं त्याच्या सोशल मीडियावर नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
News18
News18
advertisement

"स्थळ -पुणे" असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या रील व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'भय इथले संपत नाही' हे गाणं वाजतंय. पाहूयात अथर्वचा व्हिडीओ नेमका आहे तरी काय.

( अथर्व सुदामे महिन्याला किती कमावतो? गणपतीच्या रीलमुळे वादात, पण याच रील्समधून करतो लाखोंची कमाई! )

व्हिडीओमध्ये मुलगी बघण्याचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. अथर्व लग्नासाठी मुलगी बघायला गेला आहे. मुलीचे बाबा म्हणतात, 'अगं बसतील काय नाव सांगत तुझं.' मुलगी म्हणते, 'नेहा.' त्यानंतर पुन्हा तिचे बाबा अथर्वला म्हणतात, 'तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता.' त्यावर समोर ठेवलेल्या समोस्यांकडून बघत अथर्व म्हणतो, 'हे सामोसे तुम्ही खाणार नसाल तर मी खाऊ का?' अथर्वचं उत्तर ऐकून सगळेच शॉक होतात आणि बँकग्राऊंडला म्युझिक वाजतं भय इथले संपत नाही.

advertisement

अथर्वने शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओला नेहमीप्रमाणे त्याच्या चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 603K हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अथर्व सुदामे का आला वादात?

अथर्वने गणेशोत्सवानिमित्तानं हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. अथर्व सुदामेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका भाविकाच्या भूमिकेत होता. तो एका गणपतीच्या कारखान्यात जातो. तिथे काम करत असलेला माणूस हा मुस्लिम असतो. अथर्व त्याच्याकडे मुर्ती घेणार नाही असं त्याला वाटतं. पण अर्थव त्याच्याकडून बाप्पाची मूर्ती घेणार असं सांगतो. अर्थव सुदामे म्हणतो, 'माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुर्माही. तसंच आपण वीट व्हावं जी वीट देवळातही लावली जाते आणि मशि‍दीमध्ये देखील. आपण फुल व्हावं जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा."

advertisement

या व्हिडीओनंतर हिंदू महासंघ आणि इतर संघटनांकडून विरोध झाला. अथर्ववर टीका करण्यात आली. त्याला धमकीही देण्यात आली. त्यानंतर त्याला हा व्हिडीओ डिलिट करावा लागला. व्हिडीओ डिलिट केल्यानंतर त्याने माफी मागितली परंतु माफीचा व्हिडीओ देखील काही तासांनी डिलिट केला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Atharva Sudame : भय इथले संपत नाही! माफी, व्हिडीओ डिलीट अन् आता 4 दिवसांनंतर अथर्व सुदामेचा नवा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल