TRENDING:

नवाबाची लेक, गडगंज श्रीमंत, हातात फडकं घेऊन करतेय दिवाळीची साफसफाई, टीप्स तर बघूनच जा

Last Updated:

Bollywood Actress : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने दिवाळीची साफसफाई कशापद्धतीने करते हे सांगितलं आहे. व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना टिप्स दिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bollywood Actress on Diwali Safai : बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने 'दिवाळी 2025'च्या आधी घरात साफ-सफाईला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती दिवाळीच्या साफसफाईसाठी काही मजेदार आणि हटके आयडिया वापरताना दिसते.
News18
News18
advertisement

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने दिवाळी 2025 पूर्वी घराची साफसफाई करण्यासाठी एक नवा मार्ग शोधून काढला आहे. यामुळे शरीर फिट ठेवण्यासही मदत होते. तिचा हा अनोखा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. रविवारी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जिममध्ये वर्कआउट करत साफसफाई करताना दिसतेय. सोहाचा हा अंदाज आश्चर्यचकित करणारा आहे. सोहाचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की सोहा अली खान आपली दैनंदिन कामंदेखील किती हटक्या पद्धतीने करते.

advertisement

सोहा अली खानने दिले दिवाळीच्या साफसफाईचे सोपे उपाय

सोहा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती जीमच्या काचेवर दोन कपड्यांनी हातांचा व्यायाम करताना दिसतेय. ती काच पुसताना अपर बॉडीची कसरत करतेय. हा व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितलं की तिने एका वेळेस दोन कामं पूर्ण केली. जिमची साफसफाई आणि स्वतःचा व्यायाम. इथेच गोष्ट संपत नाही. तसेच आपल्या पायाखाली कपडा ठेवून जिमचा फ्लोअरदेखील साफ करते. तिचे हे दिवाळी क्लिनिंग हॅक्स सामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सर्वांनाच खूप आवडत आहेत. अनेक जण कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

advertisement

Salman Khan : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे हे 7 फोटो पाहाच! सौंदर्य पाहून नजर हटणार नाही

सोहा अली खानचा व्हिडिओ व्हायरल

सोहा अली खानने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"दिवाळीपूर्वी थोडीशी साफसफाई जिममध्ये. काच पुसली, फ्लोअर साफ केला आणि बरोबर कॅलरी पण बर्न केली. जर व्यायामात एवढी हालचाल होत असेल तर व्हॅक्यूम क्लिनरची काय गरज आहे?" सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

advertisement

'छोरी 2' मध्ये सोहाने केली होती कमाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

सोहाने 2004 मध्ये शाहिद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. पण त्यानंतर अभिनेत्री 'रंग दे बसंती', 'आहिस्ता आहिस्ता', 'खोया खोया चाँद', 'मुंबई मेरी जान', 'दिल कबड्डी', 'साहेब बीवी और गैंगस्टर' आणि 'घायल वन्स अगेन' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली. तिचा शेवटाचा 'छोरी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच 'हश हश' आणि 'कौन बनेगी शिखरवती' या वेब सीरीजमध्येही सोहाने काम केलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
नवाबाची लेक, गडगंज श्रीमंत, हातात फडकं घेऊन करतेय दिवाळीची साफसफाई, टीप्स तर बघूनच जा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल