कपिल शर्मा शोमध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकार सहभागी होत असतात. या शोमध्ये तो त्या कलाकारांची शाळा घेत असतो. पण एकदा एका एपिसोडमध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं कपिल शर्माची शाळा घेतली होती. त्याच्याशी मराठीत संवाद साधत त्याची बोलती बंद केली होती.
( कपिल शर्माची नवी इनिंग! थेट कॅनेडामध्ये सुरू केलं आलिशान रेस्टॉरंट, किंमती पाहून डोळे पांढरे होतील )
advertisement
आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. एकदा सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर एका कलाकृतीच्या निमित्तानं कपिल शर्मामध्ये शोमध्ये गेले होते. तेव्हा बडबड करणाऱ्या कपिलला सोनालीनं मराठीची ताकद दाखवली होती.
सोनाली कपिलला म्हणाली होती, "सिर्फ हिंदी, इंग्लीश की बाते करोगे, मराठीत बोल थोडं. मुंबईत तुझा शो शूट होतो. इतकं छान वाटतं मला तुला भेटून. मी सचिन आणि रवीला छान मराठी येतं. मुंबईत राहतोस, आमच्याबरोबर इथे शूटिंग करतोस, इतके सगळे छान छान कलाकार आहेत आणि आमच्याशी मराठीत बोलत नाहीस."
सोनालीबरोबरच अभिनेत्री शिबानी दांडेकर हिनं देखील कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या मराठीची शाळा घेतली होती. शिबानीने कपिलला म्हटले की, "तू इथे मला का बोलावलं आहेस. मला हिंदी येत नाही. मग ती म्हणते की मला मराठी येत तुला येतं का मराठी?" यावर कपिल निरुत्तर झाला. कपिलचा चेहरा पाहण्यासारखा होतो.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि शिबानी दांडेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.