व्हायरल व्हिडिओमध्ये, सोनम कारमध्ये बसलेली दिसते. ती एका हाताने पापाराझींना हाय करतेय तर तिचा दुसरा हात तिच्या पोटावर आहे. ती व्हिडीओमध्ये हसताना दिसतेय. तिचं हसणं आणि वागणं यातून ती प्रेग्नंट असल्याचं अखेर समोर आलं आहे.
( सुदेश भोसलेंच्या लेकीने 'या' अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा! कोण आहे जावई? PHOTO )
advertisement
सोनम कपूरने अद्याप तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी अधिकृतपणे सांगितलेली नाही. मे 2018 मध्ये आनंद अहुजा आणि सोनम यांनी लग्न केलं. दोघांना 2022 मध्ये वायु हा पहिला मुलगा झाला. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, सोनम दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती लवकर प्रेग्नंसीची बातमी सर्वांना सांगणार आहे.
अलीकडेच, सोनमने तिची चुलत बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्यालाही हजेरी लावली होती. तिथेही तिने पापाराझींना फोटो देण्यास नकार दिला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वृत्तानुसार, एका काही माणसांनी पापाराझींना त्यांचे कॅमेरे खाली करण्याची विनंती केली. ज्यामुळे सोनम शांतपणे समारंभाच्या ठिकाणी पोहचू शकेल.