सनी देओल गेली काही दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाता येताना स्पॉट झाला. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने तो टेन्शनमध्ये आहे. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते अवाक् झालेत. सनी देओलचा तारा सिंह अवतार पाहायला मिळाला.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, सनी देओल प्रचंड रागात चालत येत आहे. तो रस्त्यावर येतो, त्याच्या बाजूला त्याचे बॉडीगार्ड्सही आहेत. तो म्हणतो, तुमच्या घरी आई-वडीर आहेत. मुलं आहेत. तरी xxx सारखे व्हिडीओ काढत आहात, लाज नाही वाटत. त्यानंतर सनी मागे वळतो आणि सिक्युरिटी गार्ड्सना कडक शब्दांत वॉर्निंग देतो.
कोणावर भडकला सनी देओल?
या व्हिडीओवरून एक समजत आहे की सनी देओल घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींवर भडकला आहे. अभिनेते धर्मेंद्र जेव्हापासून रुग्णालयात दाखल झालेत तेव्हापासून त्यांच्या घराजवळ आणि हॉस्प्टिलबाहेर पापाराझी उभे आहेत. त्याचप्रमाणे धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळण्याच्या एक दिवस आधी त्यांचं निधन झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यावेळेसही सनी देओल प्रचंड भडकला होता.
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सनी देओलच्या टीमनं अधिकृत पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, "धर्मेंद्र यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरीच त्यांचे उपचार सुरू ठेवतील. आम्ही मीडिया आणि जनतेला विनंती करतो की त्यांनी कोणत्याही अपटेड टाळाव्या आणि कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा. आम्ही सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. कृपया धर्मेंद्रजींच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत राहा. कृपया त्यांचा आदर करा, कारण ते तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करत होते."
