सिडनी स्वीनीचा 'बाथवॉटर ब्लिस' साबण!
हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनी (Sydney Sweeney) हिने एक अनोखा आणि वादग्रस्त प्रॉडक्ट बाजारात आणला आहे, ज्याचे नाव आहे 'सिडनीज बाथवॉटर ब्लिस' (Sydney's Bathwater Bliss). हा साबण तिच्या खऱ्या आंघोळीच्या पाण्यापासून तयार करण्यात आला आहे आणि तो विशेषतः पुरुषांसाठी डिझाइन केला आहे. हे प्रॉडक्ट तिने डॉ. स्क्वॅच या ब्रँडसोबत भागीदारीतून तयार केला आहे.
advertisement
हा एक्सफोलिएटिंग बार साबण वाळू, पाइन बार्क एक्सट्रॅक्ट आणि सिडनीच्या खऱ्या आंघोळीच्या पाण्यापासून बनवला आहे. यात पाइन, डग्लस फीर आणि मिटी मॉसचा सुगंध आहे. सिडनीचं म्हणणं आहे की, हे उत्पादन केवळ 'स्मरणार्थ' नाही, तर त्याचा सुगंधही अविस्मरणीय आहे.
किंमत ८ डॉलर, पण मिळणार फक्त ५००० युनिट्स!
हा लिमिटेड एडिशन साबण ६ जून रोजी लॉन्च होणार असून, त्याच्या केवळ ५००० युनिट्स उपलब्ध असतील. प्रत्येक साबणाची किंमत ८ डॉलर म्हणजेच सुमारे ६८४ रुपये असेल. याशिवाय, १०० युनिट्सचं एक खास गिव्हअवे ठेवलं आहे, ज्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत, पण काही अटी पूर्ण कराव्या लागतील. डॉ. स्क्वॅच कंपनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या अटी दिल्या आहेत. यासाठी लोकांना त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो करावं लागेल, पोस्ट लाईक करून त्यावर कमेंट करावी लागेल, किंवा एक ऑनलाइन फॉर्म भरून स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. भाग घेणाऱ्यांचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे.
सिडनीने आपल्या इन्स्टाग्रामवर या उत्पादनाची घोषणा करताना लिहिलं होतं, "जेव्हा तुमचे चाहते तुमच्या आंघोळीच्या पाण्याची मागणी करतात, तेव्हा तुम्ही ती दुर्लक्षित करू शकता किंवा त्याचं डॉ. स्क्वॅच साबणात रूपांतर करू शकता." या अनोख्या उत्पादनावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला 'रचनात्मकतेचे' उदाहरण मानलं, तर काहींनी टीका केली.
नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या साबणाच्या फोटोला २ लाखांहून अधिक लाईक्स (Likes) मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका पुरुष युजरने लिहिलं, "सिडनी, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण या साबणाबद्दल काहीच बोलू शकत नाही!" एका भारतीय युजरने तर खूपच मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहिलं, "पंतप्रधान सिडनी स्वीनी बाथवॉटर दिलाओ योजना!"
एका मुलीने म्हटलं की, "आता याच प्रकारे पुरुषांना आंघोळ करायला भाग पाडलं जाऊ शकतं." तर एका पुरुष युजरने हे 'अत्यंत किळसवाणं' असल्याचं म्हणत, "मी ते विकत घेणार नाही," असं सांगितलं. एकाने तर सिडनीच्या खर्चांची इतकीही वाढ झाली की तिला असे उद्योग करून पैसे कमवावे लागत आहेत, असा टोला लगावला. हा अनोखा आणि काहीसा विचित्र प्रयोग आता किती यशस्वी होतो, हे पाहणं रंजक ठरेल!