साडेचार लाखांचा व्यवहार, पण ५ हजार रुपये गायब!
प्रियांका तेंडोलकरने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. तिने थेट कारची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या एका नामांकित कंपनीला टॅग करून आपला संताप व्यक्त केला.
प्रियांकाने सांगितले की, तिने संबंधित कंपनीला तिची कार विकली होती. "आमच्यात ठरल्याप्रमाणे मला गाडीचे ४ लाख ३० हजार रुपये मिळणार होते. परंतु, कंपनीकडून मला केवळ ४ लाख २५ हजार रुपयेच मिळाले. अजूनही माझे ५ हजार रुपये मिळालेले नाहीत," असे तिने पोस्टमध्ये स्पष्ट केले.
advertisement
कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाच्या भाकिताने उडवली खळबळ, थेट पुरावाच दिला
अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हिने पुढे सांगितले की, हे प्रकरण केवळ ५ हजार रुपयांचे नाही, तर कस्टमर सर्व्हिसच्या निष्काळजीपणाचे आहे. तिने आरोप केला की, या कंपनीतील ज्या प्रतिनिधींशी तिचे बोलणे झाले होते, ते आता तिचे फोन उचलत नाहीत किंवा तिला परत फोनही करत नाहीत.
फसवणुकीचा पुरावा म्हणून प्रियांकाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. या संभाषणांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ५ हजार रुपये देणे बाकी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कंपनीकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया न आल्यामुळे प्रियांकाने याला 'पूर्णपणे फसवणूक' असे म्हटले आहे.
प्रियांकाने ज्या कंपनीवर आरोप केला होता, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. तथापि, प्रियांकाने नुकतीच पुन्हा एक स्टोरी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे, ज्यात तिने ५००० रुपये मिळाले असं लिहिलं आहे.
या प्रकरणानंतर हे सिद्ध झाले आहे की फसवणूक कोणासोबतही होऊ शकते, अशातच आता प्रत्येकाच्या मनात ऑनलाइन व्यवहारांबाबत एक प्रकारची भीती तयार झालेली आहे. प्रियांकाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, की आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा अन्याय होत असल्यास शांत न बसता त्या विरोधात आवाज उचलावा. असे केल्याने आपल्याला न्याय मिळतोच.