कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाच्या भाकिताने उडवली खळबळ, थेट पुरावाच दिला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Katrina Kaif Vicky Kaushal baby : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे, कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल, लवकरच आई-वडील होणार आहेत. एका प्रसिद्ध ज्योतिष्याने त्यांच्या घरी मुलगा होणार की मुलगी, याबाबत मोठे भाकीत केले आहे.
मुंबई : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे, कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल, लवकरच आई-वडील होणार आहेत. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच ही गोड बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या बातमीनंतर त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. अशातच, एका प्रसिद्ध ज्योतिष्याने त्यांच्या घरी मुलगा होणार की मुलगी, याबाबत मोठे भाकीत केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कधी होणार डिलिव्हरी?
कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल यांनी गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये समाजमाध्यमांवर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. त्यांनी लिहिले होते की, "आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेसह आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्वाची सुरुवात करत आहोत." कॅटरीनाची डिलिव्हरीची निश्चित तारीख अजून समोर आलेली नाही, पण काही माध्यमांच्या माहितीनुसार, हे जोडपे याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पालक बनू शकते. चाहते त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
ज्योतिष्याचं भाकित अन् नेटिझन्सचा तर्क
या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिरुद्ध कुमार मिश्रा नावाच्या एका ज्योतिष्याने मोठे भाकीत केले आहे. या ज्योतिष्याचे म्हणणे आहे की, विक्की आणि कॅटरीना यांना कन्यारत्नाची प्राप्ती होईल. त्यांनी थेट 'एक्स'वर ट्वीट करत दावा केला आहे की, "विक्की कौशल आणि कॅटरीना कैफचे पहिले अपत्य एक मुलगी असेल."
advertisement
या ज्योतिष्याने त्याच्या 'एक्स' खात्यावर काही जुन्या भाकितांचे स्क्रीनशॉट पिन केले आहेत, ज्यात अनुष्का शर्मा-विराट कोहलीची मुलगी आणि करीना कपूर-सैफ अली खानचा दुसरा मुलगा 'जेह' यांच्या जन्माची भविष्यवाणी अचूक ठरल्याचा दावा आहे.
The first child of Vicky Kaushal and Katrina Kaif will be a daughter. pic.twitter.com/2wjWk7SaKN
— Anirudh Kumar Mishra (Astrologer) (@Anirudh_Astro) October 8, 2025
advertisement
मात्र, ज्योतिष्याच्या या दाव्यावर काही नेटिझन्सनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, "या भविष्यवाणीच्या बरोबर होण्याची शक्यता ५० टक्केच आहे!" तर दुसऱ्या एका युजरने तर्क लावला, "कोणतेही लिंग असण्याची शक्यता ५०/५० असते, हे साधं गणित आहे. जर भाकीत बरोबर आलं, तर पिन करेल, नाहीतर 'चूक झालेल्या ट्वीट्स'च्या लायब्ररीत जाईल." सध्याच्या 'डॉटर सीझन'मुळे त्यांना मुलगीच होईल, अशी गमतीशीर टिप्पणीही एका युजरने केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाच्या भाकिताने उडवली खळबळ, थेट पुरावाच दिला