1. The Exorcist (1973)
किशोरी रीगन मॅकनिलवर एक दुष्ट आत्मा कब्जा करतो, आणि तिला वाचवण्यासाठी दोन धर्मगुरू एखाद्या आत्मा काढण्याच्या विधीत सामील होतात. चित्रपट प्रचंड भयानक दृश्यांनी भरलेला आहे, जसे की रीगनचा बेड फिरणे, तिचा भयानक आवाज, आणि तिची वाकडीतिकडी हालचाल. चित्रपट पाहून प्रेक्षकांमध्ये उलट्या होणे, थिएटरमधून बाहेर पळणे, आणि मानसिक त्रास अनुभवण्याचे किस्से घटले होते.
advertisement
Best Action Film : हिरोचं डोकं फिरलं, 1 तास 48 मिनिटमध्ये संपवलं खलनायकाचं अख्खं कुटुंब, शेवट थरारक!
2. Hereditary (2018)
ग्राहम कुटुंबाच्या आयुष्यात दुर्दैवाचे सत्र सुरू होतं जेव्हा आजीच्या मृत्यूनंतर विचित्र घटनांचा प्रकार सुरू होतो. कुटुंबावर एक गुप्त पंथाचा प्रभाव आहे, ज्यामुळे भयाचे थरारक अनुभव येतात. अंगावर काटा आणणारा हा हॉरर सिनेमा आहे. चित्रपटात एक धक्कादायक डिनर सीन आणि एक अनपेक्षित मृत्यू सीन आहे. ज्यामुळे प्रेक्षक सुन्न होतात.
3. Paranormal Activity (2007)
एका दाम्पत्याच्या घरात विचित्र घटनांचा अनुभव होतो, ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतात. हळूहळू त्या घटनांचा त्रास वाढतो आणि भयावह सत्य समोर येते.चित्रपट कमी बजेटमध्ये तयार केला गेला पण सिनेमा खूप गाजला.
4. The Conjuring (2013)
पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर्स एड आणि लोरेन वॉरेन यांना एक कुटुंब भूतांपासून त्रस्त असल्याचे सांगते. त्या घरातल्या भूतकाळातील रहस्य उलगडताना त्यांच्या आयुष्याला धोका निर्माण होतो. हे भयानक हॉरर सिनेमा आहे. पाहतानाही काळजात धस्स होतं. चित्रपट वास्तव घटनांवर आधारित असल्याने प्रेक्षकांमध्ये जास्त प्रभाव पडतो. 'क्लॅपिंग गेम' सीन आजही अनेकांसाठी भयानक आहे.
5. Insidious (2010)
एक लहान मुलगा कोमात जातो आणि त्याच्या शरीरातून बाहेर पडलेली आत्मा एका भयानक आयामात अडकते. त्याला परत आणण्यासाठी त्याचे पालक अनपेक्षित जगात प्रवेश करतात. या प्रकाराचा विचार करुनच थरकाप उडतो.