'नो अफेअर क्लॉज' बद्दल काय म्हणाले असित मोदी?
'तारक मेहता'च्या सेटवर काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 'नो अफेअर क्लॉज' साईन करावा लागतो, अशी एक अफवा सिनेसृष्टीत खूप गाजली होती. असित मोदी यांनी ही अफवा पूर्णपणे फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, "लोकांनी आमच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये काय आहे हे स्वतः येऊन पाहावे. आम्ही कधीही असे नियम बनवले नाहीत की, 'मुलगा-मुलगी एकमेकांना डेट करू शकत नाहीत.'"
advertisement
असित मोदींच्या मते, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये केवळ एकच कठोर नियम आहे, तो म्हणजे 'शो आणि चॅनेलच्या प्रतिमेला नुकसान पोहोचेल' असे कोणतेही ब्रँड एंडोर्समेंट करू नये. शोमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा विचार करून कलाकारांनी हे नियम पाळले पाहिजेत, असे त्यांचे मत आहे.
सोडून गेलेले कलाकार परत येतात!
शो सोडून गेलेल्या कलाकारांबद्दल बोलताना असित मोदी थोडे भावूक झाले. ते म्हणाले, "कलाकारांनी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे आणि चांगले काम केले आहे. मी कधीही कोणाला शो सोडायला सांगितले नाही. पण, काही वेळा कलाकार स्वतःहून पुढे जातात, तेव्हा न बोलण्यासारख्या गोष्टी बोलून जातात."
असित मोदींनी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, "त्यापैकी अनेक कलाकार नंतर शोमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त करतात आणि काही जण तर परतलेही आहेत. शो सुरू राहिला पाहिजे. कोणत्याही व्यावसायिक वातावरणात नियम आणि शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते."
जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंह सोढी, शैलेश लोढा अशा अनेक कलाकारांनी शो सोडल्यानंतर निर्मात्यांवर विविध आरोप केले होते. आजही 'दयाबेन' म्हणून प्रसिद्ध असलेली दिशा वकानी या शोमध्ये परतण्याची चाहते वाट पाहत आहेत.
