जर सलमान खानने माफी मागितली तर बिष्णोई समाज त्याला माफ करेल, पण यासाठी सलमानने स्वतः येऊन चूक कबूल करून माफी मागावी. यानंतर बिष्णोई समाजातील न्यायनिवाडा करणारे एकत्र बसतील आणि 29 नियमांनुसार माफ करतील, असं देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.
सलमान खानला दिली Y+ सेक्युरिटी, भाईजानच्या सुरक्षेसाठी सरकार किती पैसे खर्च करणार?
advertisement
‘बिष्णोई समाजाच्या 29 नियमांमधल्या 10 व्या नियमात चुकीला माफ करण्याचं प्रावधान आहे. आमचे धर्मगुरू जंभेश्वर यांनी 29 नियम बनवले आहेत. जर कुणी अपराध केला असेल आणि त्याने याबद्दल माफी मागितली तर त्याला माफ केलं जाऊ शकतं, हे प्रावधान नियमांमध्ये आहे. बिष्णोई समाज कधीच कुणाचं नुकसान करत नाही, जर कुणी क्षमेच्या भावनेने येत असेल तर समाजातले प्रतिष्ठित लोक बसून त्या व्यक्तीला माफ करतात’, असं देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.
काय आहेत बिष्णोई समाजाचे 29 नियम?
बिष्णोई समाजाच्या 29 नियमांचं पालन समाजात शांती, निसर्ग प्रेम आणि धार्मिक अनुशासन ठेवण्यासाठी केलं जातं.
सकाळी स्नान करून पावित्र्य राखावं
नम्रता, समाधान आणि पावित्र्य पाळणं
सकाळ-संध्याकाळ संध्या आणि प्रार्थना करणं
संध्याकाळी आरती करणं आणि भगवान विष्णूची प्रार्थना करणं
सकाळी हवन करणं
पाणी गाळून पिणे आणि वाणी शुद्ध ठेवणे
इंधन आणि दूध गाळून वापरणे
क्षमा आणि सहनशीलतेचं पालन करणे
दया आणि नम्रतेने आयुष्य जगणे
चोरी करू नये
कुणाचीही निंदा करू नये
खोटं बोलू नये
वादापासून लांब राहावं
अमावस्येला व्रत ठेवणं
विष्णूचं भजन करणे
सर्व प्राण्यांवर दया करणे
वृक्षतोड करू नये
स्वतःच्या हाताने जेवण बनवणे
बैलाला नपुंसक न करणे
अंमली पदार्थ, तंबाखू, भांग आणि दारूचं सेवन न करणे
मांसाचं सेवन न करणे
निळ्या रंगाचे कपडे न घालणे
दरम्यान, 1998 साली “हम साथ साथ है” च्या शूटिंगवेळी सलमान खानसह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे, पण या घटनेमुळे बिष्णोई समाज सलमान खानविरोधात आहे.