TRENDING:

सुरज चव्हाण की अभिजीत सावंत, कोण ठरणार बिग बॉस मराठी 5 चा विजेता? पुणेकर म्हणतात…

Last Updated:

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट प्रेक्षकांना मिळाले आहेत. यावर्षी सिझन 5 चा विजेता कोण होईल तसेच यावर्षीचं सिझन नेमकं कसं होतं? याविषयीची माहिती आपण पुण्यातील बिग बॉसचे प्रेक्षक यांच्याकडून जाणून घेऊया. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी 
advertisement

पुणे : बिग बॉस मराठी पाच हा सीजन प्रचंड गाजला. या सीझनमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे प्रेक्षकांमध्येही बिग बॉसचं क्रेझ पाहायला मिळालं. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट प्रेक्षकांना मिळाले आहेत. यावर्षी सिझन 5 चा विजेता कोण होईल तसेच यावर्षीचं सिझन नेमकं कसं होतं? याविषयीची माहिती आपण पुण्यातील बिग बॉसचे प्रेक्षक यांच्याकडून जाणून घेऊया.

advertisement

अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे टॉप 6 स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. सहा जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Bigg Boss Marathi: वर्षाताई गोव्याच्या तरी मराठीवर एवढं प्रभुत्त्व कसं? त्यांनी स्पष्टच सांगितलं...

View More

याविषयी बोलतांना बिगबॉस प्रेक्षक आणि अभिनेत्री आर्या घारे हिने म्हटल की, भाऊंचा धक्का यावेळी रितेश देशमूख यांनी चांगलाच गाजवला. त्याचबरोबर कोणा एका स्पर्धेकाला पाठिंबा न देता त्यांनी सर्वांना सामान न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या शनिवार तसेच रविवारच्या धक्क्यावर केला आहे. अनेक उतार चढाव या कार्यक्रमात पाहायला मिळाले होते. पण तरीदेखील यावेळीच्या सिझनने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले.

advertisement

दोन वर्षांनी 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर पार पडला. जेव्हा या शोची अधिकृत घोषणा झाली. त्याचवेळी प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं. अवघ्या 70 दिवसांचा हा शो होता. प्रेक्षक म्हणून मी या शोला प्रचंड मिस करेल, असं आर्या हिने म्हटलं तर सुरज चव्हाण किंवा अभिजित सावंत यांपैकी कोणीतरी विनर होईल, पण मला वाटतं अभिजितने जिकावं अस देखील तिने म्हटलंय.

advertisement

त्याचंबरोबर प्रेक्षक ऋषिकेश खानोटे याने म्हटलं की, मला सुरजचा गेम प्रचंड आवडला. त्याने कुठलाही गेम प्लॅन न करता हा गेम उत्तमरित्या खेळला. त्याच्या साध्या सरळ गोष्टी मनाला भावणाऱ्या अशा होत्या. त्यामुळे त्याला सुरज चव्हाण हाच बिगबॉसची ट्रॉफी घेऊन जाईल अस वाटत आहे, असं त्याने म्हटलं.

आता अवघ्या काही तासांवर बिग बॉसचा फिनाले आलाय. स्पर्धकांमध्ये मोठी चुरस ही बघायला मिळतंय. वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा वोटिंग ट्रेंडमध्ये टॉपला आहे. अस लेटेस्ट वोटिंग पोलनुसार सांगण्यात येत आहे. तर बहुप्रतिक्षित बिग बॉस सीजन 5 चा विनर नेमका कोण होणार  हे उद्या रात्री सर्वांना समजेल. या ग्रँड फिनाले ची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सुरज चव्हाण की अभिजीत सावंत, कोण ठरणार बिग बॉस मराठी 5 चा विजेता? पुणेकर म्हणतात…
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल