शंतनु मोघे असं प्रियाच्या नवऱ्याचं नाव आहे. शंतनु अनेक वर्ष मराठी मालिका,टेलिव्हिजन आणि सिनेमात काम करत आहे. आजवर त्याने अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये काम केलं आहे. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांचा तो मुलगा आहे. शंतनूला वडिलांकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं.
advertisement
शंतनू मोघे गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत अभिनय करत आहे. पण त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप लोकप्रिय झाली. या भूमिकेनं मराठी टेलिव्हिजन गाजवलं होतं. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वोत्तम भूमिका साकारणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक शंतनू मोघे आहे.
शंतनू मोघेनं आई कुठे काय करते या मालिकेत काम केलं. अनिरुद्धच्या भावाची भूमिका त्यानं केली होती. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सध्या तो स्टार प्रवाहवरील याड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करत आहे.
2012मध्ये शंतनू आणि प्रिया यांनी लग्न केलं. दोघे आई या मालिकेच्या सेटवर भेटले. मालिकेच्या पार्टीमध्ये दोघांचे सूर जुळले. शंतनूने एका दिवसात थेट प्रियाला लग्नाची मागणी घातली. प्रियानेही होकार दिला.