कधी होणार डिलिव्हरी?
कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल यांनी गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये समाजमाध्यमांवर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. त्यांनी लिहिले होते की, "आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेसह आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्वाची सुरुवात करत आहोत." कॅटरीनाची डिलिव्हरीची निश्चित तारीख अजून समोर आलेली नाही, पण काही माध्यमांच्या माहितीनुसार, हे जोडपे याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पालक बनू शकते. चाहते त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
ज्योतिष्याचं भाकित अन् नेटिझन्सचा तर्क
या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिरुद्ध कुमार मिश्रा नावाच्या एका ज्योतिष्याने मोठे भाकीत केले आहे. या ज्योतिष्याचे म्हणणे आहे की, विक्की आणि कॅटरीना यांना कन्यारत्नाची प्राप्ती होईल. त्यांनी थेट 'एक्स'वर ट्वीट करत दावा केला आहे की, "विक्की कौशल आणि कॅटरीना कैफचे पहिले अपत्य एक मुलगी असेल."
या ज्योतिष्याने त्याच्या 'एक्स' खात्यावर काही जुन्या भाकितांचे स्क्रीनशॉट पिन केले आहेत, ज्यात अनुष्का शर्मा-विराट कोहलीची मुलगी आणि करीना कपूर-सैफ अली खानचा दुसरा मुलगा 'जेह' यांच्या जन्माची भविष्यवाणी अचूक ठरल्याचा दावा आहे.
मात्र, ज्योतिष्याच्या या दाव्यावर काही नेटिझन्सनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, "या भविष्यवाणीच्या बरोबर होण्याची शक्यता ५० टक्केच आहे!" तर दुसऱ्या एका युजरने तर्क लावला, "कोणतेही लिंग असण्याची शक्यता ५०/५० असते, हे साधं गणित आहे. जर भाकीत बरोबर आलं, तर पिन करेल, नाहीतर 'चूक झालेल्या ट्वीट्स'च्या लायब्ररीत जाईल." सध्याच्या 'डॉटर सीझन'मुळे त्यांना मुलगीच होईल, अशी गमतीशीर टिप्पणीही एका युजरने केली.