युझवेंद्र चहल धनश्री वर्माला किती पोटगी देणार?
क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने कोरिओग्राफर धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देण्यास सहमती दर्शविली आहे. बुधवारी बार अँड बेंचने अहवाल दिला की संमतीच्या अटीनुसार, चहलने वर्मा यांना 4.75 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्यास सहमती दर्शविली आहे.
'क्रिकेटर्स दूध पिणारी बाळं आणि पत्नी गोल्ड डिगर' घटस्फोटावरुन भडकली उर्फी जावेद
advertisement
यापैकी 2.37 कोटी रुपये कोरिओग्राफरना आधीच देण्यात आले आहेत.उर्वरित रक्कम अद्याप दिली नसल्यामुळे कुटुंब न्यायालयाने सहा महिन्यांच्या कुलिंग कालावधीची सूट देण्याची त्यांची याचिका फेटाळली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय उलथवून लावत 20 मार्च रोजी घटस्फोटावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी अनेक वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला होता की कोरिओग्राफर धनश्री क्रिकेटपटूकडून पोटगी म्हणून 60 कोटी रुपये मागत होती. मात्र धनश्रीच्या कुटुंबाने या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं.
दरम्यान, हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13बी नुसार, परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांचा कुलिंग कालावधी आवश्यक असतो. हा कालावधी पती-पत्नीला पुन्हा एकत्र येण्याची संधी देण्यासाठी असतो. तथापि, चहल आणि धनश्री अडीच वर्षांपासून वेगळे राहत असल्यामुळे, उच्च न्यायालयाने या प्रकरणात कुलिंग कालावधीला दिला नाही.
2020 मध्ये लग्नबंधनात अडकलेले युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या जवळजवळ एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. त्यांचा घटस्फोट उद्या, 20 मार्च रोजी होणार आहे.