हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटिऑक्सिडंटयुक्त फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. ‘व्हिटॅमिन सी’ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाही तर त्वचेच्या आरोग्यतही सुधारणा होते. जर तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ मिळालं नाही तर अनेक आरोग्यविषयक समस्याचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. हिवाळ्यात मिळणाऱ्या आवळा आणि संत्री या दोन्ही फळांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात आढळून येतं.
advertisement
मात्र कोणत्या फळात ‘व्हिटॅमिन सी’ हे अधिक आहे आणि हिवाळ्यात आवळा की संत्री या दोघांपैकी काय खाणं हे जास्त फायदेशीर आहे ते पाहुयात.
हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे:
आवळ्यात ‘व्हिटॅमिन सी’ सोबतत लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराला विविध पायदे मिळतात. ‘व्हिटॅमिन सी’ मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढयला मदत होते. तर लोहामुळे रक्ताची कमतरता भरून निघते. दात आणि हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम फायद्याचं ठरतं. 100 ग्रॅम आवळ्यामध्ये 600-700 मिलीग्रॅम ‘व्हिटॅमिन सी’ असतं, जे आपल्या दैनंदिन गरजेपेक्षा खूप जास्त असतं.
हिवाळ्यात संत्री खाण्याचे फायदे:
संत्र्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’सोबत अँटिऑक्सिड्टस आणि फायबर्स आढळून येतात. अँटिऑक्सिड्टसमुळे त्वचा निरोगी राहायला मदत होते. तर फायबर्समुळे अन्न चांगलं पचायला मदत होऊन पोट भरल्यासारखं राहतं. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते. संत्र्यांमध्ये आवळ्यापेक्षा ‘व्हिटॅमिन सी’हे बऱ्याच कमी प्रमाणात असतं. 100 ग्रॅम संत्र्यामध्ये आवळ्याच्या तुलनेत फक्त 50-70 मिलीग्राम ‘व्हिटॅमिन सी’ आढळून येतं.
आवळा की संत्री ?
हिवाळ्यात संत्री आणि आवळा खाण्याचे फायदे आपण पाहिले. आवळ्याच्या तुलनेत संत्र्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ कमी असतं. मात्र संत्र्यांची आंबटगोड चव ही लहानथोरांपासून सगळ्यांना आवडते. याशिवाय भूक लागल्यावर फळ म्हणून संत्री खाता येते तसा आवळा खाता येत नाही. आधी सांगितल्या प्रमाणे आवळ्यात असलेले ‘व्हिटॅमिन सी’ हे आपल्या दैनंदिन गरजेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आवळ्याच्या ऐवजी संत्री खाणं हे केव्हाही चांगलं. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती फारच कमी आहे त्यांच्यासाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे.संत्री खाल्ल्याने शरीराला ‘व्हिटॅमिन सी’ मिळण्यासोबत वजन नियंत्रणात ठेवण्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या आवडीनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसा तुम्ही आवळा आणि संत्री दोन्ही खाऊ शकता.