Healthy Breakfast: लठ्ठपणा गायब आणि दिवसभर एनर्जी; ब्रेकफास्टमध्ये खा फक्त या 4 गोष्टी!
घरातील किडे पळवून लावण्यासाठी काही ट्रिक वापरा
1. घरामध्ये किडे येऊ नये म्हणून घरात कापूर पेटवा. कापूर जाळल्यानंतर किडे जवळ येत नाहीत. कापूरच्या स्ट्रॉंग वासाने किडे लांब पळतात. यामुळे घरातील लपलेले मच्छरही पळून जातात.
2. किडे आणि मुंग्यांना घरातून पळवण्यासाठी बेकिंग सोडाही कामात येतो. पिठामध्ये बेकिंग सोडा मिक्स करुन मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे करुन घराच्या कोपऱ्यात ठेवा.
advertisement
3. इसेंशिअल ऑइलनेही किडे दूर पळतात. या तेलाचा वास तीव्र असतो त्यामुळे घरातील मुंग्या किडे घरात येत नाही. घरात असलेले पळून जातात.
4. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून घरात मारु शकता. बाथरूम, किचन आणि रुमच्या दरवाज्यात मारु शकता. यामुळे घरामध्ये किडे येण्यापासून बचाव होईल आणि किडे पळतील.
5. किडे जास्त असतील तिथे सुक्या कडुलिंबाची पाने जाळून ठेवावीत. कडुलिंबाच्या पानांचा धूर घराजवळ किडे येण्यापासून रोखेल.
दरम्यान, पावसाळ्यात डास आणि माश्या झपाट्याने वाढतात. दरवाजा उघडा राहिला तरी लगेच घरात प्रवेश करतात. त्यामुळे पावसाल्या आरोग्याला अधिक धोका असतो. अधिक काळजी घेण्याची गरज असते.