जाणून घेऊयात कोलेजन वापरण्याचे फायदे आणि योग्य वेळ
कोलेजन कोणी वापरावं?
सध्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीही सुंदर दिसण्यासाठी कोलेजनचा वापर करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते 25 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींनी कोलेजन वापरणं फायद्याचं ठरतं.
advertisement
कोलेजन वापरण्याची योग्य वेळ?
तसं पाहायलं गेलं तर कोलेजेन घेण्याची काही ठराविक वेळ नाहीये. मात्र सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना कोलेजन घेतल्यास ते जास्त फायद्याचं ठरू शकतं. सकाळी रिकाम्या पोटी कोलेजन घेतल्यास ते शरीरात चांगलं शोषलं जाऊ शकतं. झोप ही आपल्या शरीरासाठी आवश्यक मानली जाते. कारण झोपेमुळे शरीराला आराम मिळतो आणि शरीराच्या पेशींची पुर्ननिर्मिती आणि पुर्नबाधंणी होऊन शरीराला नव्याने ताकद मिळते. अशावेळी रात्रीच्या वेळी कोलेजन घेणं शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं.
परिणाम केव्हा दिसून येतो ?
कोलेजन हे शरीरासाठी फायद्याचं जरी असलं तरीही त्याचे थेट परिणाम दिसून यायला वेळ जातो. कारण कोलेजन हे थेट त्वचेत जात नाही. ते घेतल्यानंतर शरीरात जातं. त्यानंतर पचनक्रियेदरम्यान त्यात अमिनो ॲसिड मिसळून रक्तप्रवाहाच्या माध्यमातून ते शरीरात मिसळायला सुरवात होते. त्यामुळे त्याचे परिणाम दिसून येण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा वेळ जाऊ शकतो. मात्र 15 दिवसात त्वचेवर त्याचा परिणाम दिसायला लागू शकतो.
कोलेजनसह सोबत काय घ्यावं आणि काय टाळावं ?
‘व्हिटॅमिन सी’ सोबत कोलेजन घेतल्याचा जास्त फायदा होऊ शकतो. कारण शरीरात नैसर्गिकरित्या कोलेजन तयार करण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ आवश्यक आहे. मात्र तुम्ही कोलेजन सोबत आयर्न सप्लिमेंट्स घेणं टाळा कारण दोन्ही गोष्टी एकाच वेळी शरीरात शोषून घेताना त्रास होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा :Winter Skin Care : थंडीच्या दिवसात अशी घ्या त्वचेची काळजी, घरगुती उपाय नक्की करुन बघा
हायड्रोलाइज्ड कोलेजन फायद्याचं
हायड्रोलाइज्ड कोलेजन किंवा कोलेजन पेप्टाइड्स हे शरीरात सहजपणे शोषले जाऊ शकतात. ते थंड आणि गरम दोन्ही सोबत द्रवांमध्ये मिसळले जाऊ शकतात. जर तुम्हाला सीफूडची ऍलर्जी नसेल, तर समुद्री कोलेजन हा एक सर्वोत्तम पर्याय आहे ते मानवी शरीरातल्या कोलेजनशी जुळतं.