Skin Care Tips : पन्नाशीपर्यंत चिरतरुण दिसायचंय? तुमच्या घरातच आहे अस्सल खजिना..

Last Updated:
8 Foods That Slow Down Ageing : वृद्धत्व ही एक अशी प्रक्रिया आहे जी थांबवता येत नाही. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे काही लोक पाहिले असतील ज्यांचं वय खूप आहे, परंतु त्यांच्याकडे पाहून ते जाणवत नाही. त्यांची त्वचा त्यांचे वयही दाखवत नाही. तुम्ही देखील असे चिरतरुण दिसू शकता. तुमच्या त्वचेला वृद्ध दिसण्यापासून नक्कीच रोखता येते. तुम्हाला बाजारात अनेक रासायनिक उत्पादने आढळतील जे वृद्धत्वविरोधी असल्याचा दावा करतात. परंतु आपल्या सभोवताच्या निसर्गात त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करणाऱ्या अन्नपदार्थांचा खजिना आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या त्वचेला तरूण ठेवण्यासाठी आश्चर्यकारक काम करतात.
1/11
त्वचा तरुण कशी दिसते? : स्किन केअरच्या जगात तुम्ही 'कोलेजन' हा शब्द नक्की ऐकला असेल. हाच घटक तुमची त्वचा तरुण ठेवण्याचे काम करतो. वास्तविक कोलेजन हे आपल्या शरीरात आढळणारे एक प्रकारचे प्रोटीन आहे. आपल्या त्वचेच्या आर्द्रतेसाठी कोलेजन जबाबदार असते. कोलेजन हे आपल्या स्नायू, हाडे आणि अस्थिबंधनांमध्ये आढळते. या भागांत कोलेजनच्या प्रमाणामुळे तुमची त्वचा तरुण दिसते.

advertisement
2/11
आजरोजी बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी कोलेजन वाढवण्याचा दावा करतात. परंतु येथे आम्ही तुम्हाला नैसर्गिक पदार्थांबद्दल सांगत आहोत जे सतत खाल्ल्याने कोलेजन वाढते आणि हे पदार्थ तुमच्यासाठी अँटी-एजिंग प्रोडक्ट म्हणून काम करतात.

3/11
हिरव्या भाज्या: ब्रोकोली, पालक आणि मेथीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. या भाज्या खाल्ल्याने कोलेजन तयार होण्यास मदत होते.

4/11
मासे हा कोलेजन वाढवण्याचा उत्कृष्ट स्रोत आहे. सॅल्मन आणि मॅकेरल सारख्या माशांमध्ये कोलेजन तयार करणारे ओमेगा 3 आणि फॅटी ऍसिड भरपूर असतात.

5/11
अंड्यांमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्सचे काम करणारे अमीनो ॲसिड असते. त्यामुळे अंडी देखील वृद्धत्व विरोधी घटक म्हणूण काम करू शकतात.

6/11
एवोकॅडो हे एक असे फळ आहे अतिशय चवदारच आहे आणि त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट देखील जास्त प्रमाणात असते. हे फळ तुमच्या त्वचेचे पोषण करते, तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी दाहक-विरोधी म्हणूनही काम करते. हे फळ तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासूनही वाचवते.

7/11
बेरी: स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी सारख्या बेरीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट असतात जे कोलेजन तयार करण्यास मदत करतात.

8/11
सुका मेवा आणि बिन्स: फ्लेक्ससीड, चिया सीड्स, टरबूजाच्या बिया, खरबूज, बदाम, अक्रोड इत्यादींमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात जे कोलेजन तयार करतात.

9/11
डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेट मध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. पंरुतु ते कमी प्रमाणात खाल्ले जाऊ शकते. डार्क चॉकलेटमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.

10/11
रताळे : तुम्ही अनेक सेलिब्रिटींच्या आहारात रताळे पाहिले असतील. त्वचेच्या आरोग्यासाठीही हे एक उत्तम फळ आहे.

11/11
लिंबूवर्गीय फळे: संत्रा, लिंबू, द्राक्षे या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. हा घटक कोलेजन तयार करण्यास देखील मदत करतो.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement