पायलच्या हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला कारण एक तर ती फक्त 27 वर्षांची आहे आणि दुसरं म्हणजे महिलांमधील इस्ट्रोजेन हार्मोनमुळे त्यांना हार्ट अटॅकपासून संरक्षण मिळतं. कारण हे हार्मोन रक्तवाहिन्या रक्तप्रवाहासाठी पुरेशा रुंद ठेवतात आणि जळजळ कमी करतात. मग पायलला हार्ट अटॅक आला कसा? तर याचं कारण होतं ते गर्भनिरोधक गोळ्या.
advertisement
'चमत्कारिक' मासा! डायबेटिज, बीपी, वजन, कोलेस्ट्रॉल सगळं सगळं कंट्रोलमध्ये ठेवतो
चर्नी रोडजवळील सैफी हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ आणि पायलवर उपचार करणारे डॉ. कौशल छत्रपती यांनी सांगितलं, पायलच्या बाबतीत हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) साठी लिहून दिलेल्या गर्भनिरोधक गोळ्या होत्या. हा एक हार्मोनल विकार आहे ज्यामध्ये मासिक पाळी अनियमित होते आणि अंडाशयांवर सिस्टची उपस्थिती असते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पायलच्या वडिलांनी सांगितलं की तिला जवळजवळ दहा वर्षांपासून पीसीओएसचा त्रास होत होता आणि तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी सात वर्षे गर्भनिरोधक गोळ्या लिहून दिल्या.
Health Risk Of The Day : सकाळचा नाश्ता नाही केला तर काय होईल?
फेब्रुवारीमध्ये 'द बीएमजे' मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या डेन्मार्कच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या हार्मोनल गर्भनिरोधक ज्यात इस्ट्रोजेन-प्रोजेस्टिन असतं ही गोळी इस्केमिक स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका दुप्पट करतं.
संशोधनानुसार एक वर्षासाठी ही गोळी घेणाऱ्या प्रत्येक 4760 महिलांना एक अतिरिक्त स्ट्रोक आणि प्रत्येक 10000 महिलांना एक अतिरिक्त हृदयविकाराचा झटका आला आहे.