बरेच लोक नाश्त्यामध्ये बटाटा पराठा, पुरी आणि भाज्यांसह विविध पदार्थ खातात. पण मधुमेही रुग्णांनी या गोष्टी खाणं टाळल्या पाहिजेत. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या नाश्त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे त्यांची रक्तातील साखर अचानक वाढणार नाही आणि शरीरालाही फायदा होईल. आज आम्ही तुम्हाला मधुमेहासाठी नाश्त्याचे सर्वोत्तम पर्याय सांगत आहोत.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी उकडलेले अंडे नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने, मध्यम चरबी आणि कार्बचे प्रमाण कमी असते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. अंडी खायची नसल्यास नाश्त्यात ओट्सचाही समावेश केला जाऊ शकतो. दलिया भाज्यांसोबत मिसळून खाल्ल्यास चवीसोबतच आरोग्यही सुधारते. ओटमीलमध्ये विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
advertisement
अंड्यातील पिवळा बलक खरंच कोलेस्ट्रॉल वाढवतो का? तज्ज्ञांनी सांगितले खावे की नाही..
नाश्त्यात चिया सीड्स पुडिंग खाणे देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते आणि त्यात कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. यामुळे मधुमेहींसाठी चिया सीड्स पुडिंग खाणे फायदेशीर आहे. चिया सीड्स पुडिंग बनवण्यासाठी चिया सीड रात्रभर दुधात भिजवून फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे खा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. चिया सीड्स व्यतिरिक्त नट बटरसोबत मल्टीग्रेन टोस्ट सकाळी खाल्ल्यास रक्तातील साखर दिवसभर नियंत्रणात राहते. नट बटरमध्ये निरोगी चरबी असते, जी साखरेची पातळी नियंत्रित करते.
तुम्हाला चविष्ट नाश्ता करायचा असेल तर तुम्ही बेसनाचा चीला किंवा धिरडे बनवून सकाळी चटणीसोबत खाऊ शकता. बेसन चीला मध्यम प्रमाणात प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतो. याने दुपारपर्यंत आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका नसतो. कर्बोदकांचे सेवन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, जो मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतो. मात्र, सकाळच्या नाश्त्याव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांनी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात खाल्लेल्या पदार्थांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आहारात सामील करा हे 3 प्रकारचे तेल आणि तूप; बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल, 100 वर्ष जगाल
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)