कांदा लसूण विरहित समोसा
बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये अनेक खवय्यांना हवेहवेसी वाटणारी स्नॅक सेंटर आणि रेस्टॉरंट आहेत. इथं अनेक विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. यामधील स्वराष्ट्र स्वीट होम मध्ये मिळणाऱ्या गरमागरम समोस्याची चव काही न्यारीच आहे. विशेष म्हणजे हा समोसा कांदा लसूण विरहित असून सुद्धा याची चव अप्रतिम लागते. विशेष म्हणजे हीच याची खासियत आहे. त्यामुळे खवय्ये या ठिकाणी हा सामोसा खाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास मोठी गर्दी करतात.
advertisement
दुष्काळग्रस्त भागात अमेरिकन फळाची जादू; शेतकऱ्याच्या मेहनतीचं चीज, झाला लखपती
कशी झाली सुरुवात?
बीड स्टेडियम रोड परिसरामध्ये एका छोट्याशा गाळ्यामध्ये 2002 च्या सुमारास या स्वीट होमच्या व्यवसायाला योगेश पडझरिया आणि त्यांच्या भावाने सुरुवात केली. सुरुवातीला दिवसाकाठी पाच ते सहा किलो बटाटा समोसा बनवण्यासाठी लागत होता. त्यावेळी 50 ते 100 एवढ्या सामोस्यांची विक्री देखील होत होती. मात्र ग्राहकांना या समोस्याची चव चटकदार आणि चवदार लागू लागली आणि हळूहळू खवय्यांची गर्दी वाढतच गेली, असे पडझरिया सांगतात.
कसा बनतो समोसा?
विशेष म्हणजे ज्यावेळी समोस्यासाठी बटाट्याची भाजी बनवतात त्यावेळी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या लाल मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट याच मिश्रणात टाकली जाते. त्यावरून लिंबू पिळून हे सर्व मिश्रण एकत्रित कालवले जाते. यात कांदा लसूण वापरत नाहीत. त्यानंतर मिश्रण तयार करून समोसा बांधला जातो. मग हा समोसा गरमागरम तेलात खुसखुशीत तळला जातो. हा समोसा हिरवी चटणी आणि गोड आंबट पाणी देऊन ग्राहकांना दिला जातो.
Video: शाळेच्या भिंतीही लागल्या बोलू.., कोरोना काळातील अनोख्या कामासाठी शिक्षकाला मोठं बक्षीस
20 रुपयांना मिळतो समोसा
सुरुवातीला ज्यावेळी आम्ही या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा जवळपास पाच रुपये प्रति सामोसा दर होता. आता ग्राहकांची संख्या वाढली आहे. तसेच साहित्याचे दरही वाढले आहेत. सध्या दिवसाकाठी 20 किलो बटाट्याचे मिश्रण हे समोसा बनवण्यासाठी लागते. तर दिवसाला 300 ते 400 समोस्यांची विक्री होते. आता या समोसाचा दर हा महागाईमुळे वीस रुपये करावा लागलाय, असे समोसा विक्रेते योगेश पडझरिया सांगतात.