कुठे मिळत आहे वडापाव?
ठाण्याच्या स्टेशन जवळील परिसरात असलेले श्री मराठा फुड ऑफ वर्ल्ड या दुकानात चिकन वडापाव खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.या ठिकाणी चिकन वडापावची मागणी सर्वात जास्त केली जाते. श्री मराठा फूड ऑफ वर्ल्डचे मालक भरत दत्ताराम शिंदे आणि आणि त्यांचा भाऊ गणेश दत्ताराम शिंदे गेली सोळा वर्षांपासून हे दुकान सांभाळत आहेत. या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे वडापाव सोबतच स्पेशल चायनीज भेळ आणि श्वारमा देखील या ठिकाणी मिळतो.
advertisement
पावसाळ्यात पालकाचे भज्जे खाताय? पण शेती कशी होते माहितीये का? कशी होते पेरणी? VIDEO
कसा बनवला जातो वडापाव?
या चिकन वडापावमध्ये बोनलेस चिकनचे बॅटर बनवून तो वडा तेलात तळला जातो. त्यावर बटरने पाव गरम करून त्या पावात तो वडा स्पेशल चटणी लावून गरम करण्यात येतो. गरमागरम चिकन वडापाव प्लेटवर घेऊन त्याला भरपूर चीज आणि केचप सोबत सर्व्ह केले जाते. या चिकन वडापावची किंमत 50 रुपये अशी आहे.
'या’ पदार्थांचा जेवणात वापर करून आजारांना करा हद्दपार, तुम्ही कल्पना केली नसेल इतके आहेत फायदे
चिकन वडापाव खवय्ये चवीने खातात
हा चिकन वडापाव खवय्ये अगदीच चवीने खातात. चिकन वडापाव बरोबरच लोक येथील चायनीज भेळ देखील आवडीने खातात. आम्ही मार्केटिंगच्या नोकरीला कंटाळून स्वतःचा काहीतरी फूड व्यापार करायचा असे ठरवून श्री मराठा फूड ऑफ वर्ल्डची स्थापना केली. सुरुवातीला या ठिकाणी फक्त चायनीज वेळ मिळायची. मात्र खवय्यांची मागणी लक्षात घेता या ठिकाणी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, अशी माहिती येथील मालक भरत शिंदे यांनी दिली आहे.