मुंबई : वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण...आणि मुंबईचा वडापाव म्हणजे देश-विदेशातील खव्वयांसाठी पर्वणी. तुम्ही आजवर मुंबईत किंवा मुंबईबाहेर वेगवेगळ्या ठिकाणच्या वडापावची चव चाखली असेल. काही वडापाव भारी लागले असतील, काही वडापाव लय...भारी लागले असतील. पण तुम्ही कधी इडली वडापाव खाल्लाय का? असा वडापावपण असतो? पडला ना प्रश्न? होय, हा पदार्थ चवीला एकदम Yummy लागतो आणि तो तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता.
advertisement
स्मिता कापडणे यांनी इडली वडापावची रेसिपी सांगितली आहे. खरंतर आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याचदा आपली पहिली ऑर्डर असते इडली किंवा मेदू वडा. शिवाय वडापाव सर्वांनाच आवडतो. लोकांची ही आवड लक्षात घेऊनच इडली वडापाव जन्माला आला असं म्हणायला हरकत नाही. ज्यांना खरोखर इडली आणि वडापाव हे दोन्ही पदार्थ भरपूर आवडत असतील, त्यांनी हा इडली वडापाव आवर्जून खायला हवा. तो कसा बनवायचा, पाहूया.
हेही वाचा : Weight Loss : मनसोप्त आंबे खाऊनही वजन कमी करता येईल, फक्त फॉलो करा या टिप्स
साहित्य : मोहरी, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, मिरची, आलं, बेसन पीठ, लसूण, बटाटे, मीठ, इडलीचं आंबवलेलं पीठ, खायचा सोडा, इत्यादी.
कृती : सुरूवातीला बटाटे वडे बनवून घ्यायचे. त्यासाठी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर एकत्र करून त्यांची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर बटाटे उकडून त्यांची साल काढा. मग तयार केलेली पेस्ट तव्यावर परतवून त्यात बटाटे मिक्स करा आणि या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. आता इडली पात्रात इडलीचं आंबवलेलं पीठ आणि बटाट्याचं सारण घालून इडल्या बनवा.
इडल्या तयार झाल्या की वड्याप्रमाणे पावाच्या मध्ये घेऊन चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम इडली वडापावचा आस्वाद घ्या. तुम्ही या इडल्या बेसन पिठात बुडवून तळून अगदी वड्यांसारख्या बनवूनही खाऊ शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी इडली वडापाव नक्की बनवा.