सांगली : प्रत्येक घरात चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी आट्याचा वापर होतोय. दैनंदिन जीवनात गहू आटा हा रोजच्या वापरातील पदार्थ बनलाय. स्वयंपाक घर, हॉटेल, बेकरी या प्रत्येक ठिकाणी आट्याची गरज असते. आपल्या स्वयंपाक घरात पॅकिंगमधून येणारा गहू आटा नेमका बनतो तरी कसा? याबद्दलचं सांगलीतील आटा उद्योजक प्रशांत यादव यांनी माहिती दिली आहे.
advertisement
आटा कसा बनतो?
पहिली स्टेप : गोडाऊनमध्ये साठा केलेला गहू टॅंकमध्ये ओतले जातात. आटा हा अतिशय बारीक पदार्थ असल्याने गव्हाची साफसफाई योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. टॅंकमधील गहू स्वच्छ करण्यासाठी अनेक फिल्टर जोडलेले असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टर मधून धूळ, खडे, माती वेगळी होते.
सायंकाळच्या नाश्त्याच टेन्शन सोडा, कमी वेळात बनवा चटपटीत मुरमुरे चिवडा, पाहा रेसिपी Video
दुसरी स्टेप : आता साफ झालेल्या गव्हामधून भुसा बाजूला काढला जातो आणि गहू दळण्यासाठी पुढे जातो.
तिसरी स्टेप : आता गहू बारीक करून तो एकदा नाही तर दोनदा हाय प्रेशर रोलरने बारीक केला जातो. खूप बारीक पावडर तयार होतै.
चौथी स्टेप : आता पीठ पॅकेजिंगसाठी वेगवेगळ्या फिल्टर प्रक्रियेतून जाते. या प्रक्रियेत सर्व कण काढून टाकले जातात. आटा चाळल्यासारखा स्वच्छ होऊन पॅकेजिंगसाठी पुढे जातो.
पाचवी स्टेप : पाच किलो वजन तपासून आटा बॅगचे पॅकेजिंग केले जाते.
गव्हापासून आटा तयार होण्याच्या या प्रक्रियेमध्ये विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर होताना दिसत नाही. झपाट्याने बदलत चाललेले राहणीमान यासाठी आट्यासारखे प्रक्रिया युक्त पदार्थ काळाची गरज बनले आहेत. स्वच्छ वातावरणात तयार होणारा गहू आटा खरेदी करताना ग्राहकांनी तारीख तपासून फ्रेश आट्यास पसंती द्यावी, असं प्रशांत यादव यांनी सांगितलं.