घाटकोपरची खाऊ गल्ली
घाटकोपर मधील खाऊ गल्ली मुंबईकर खवय्यांचं अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड आयटम्स आपल्याला मिळतात. येथील दिलखुश दाबेली स्टॉल खवय्यांना आकर्षित करतोय. कारण या ठिकाणी दाबेली ही आईस्क्रीमप्रमाणे कोनमध्ये सर्व्ह केली जाते. 40 रुपयांत मिळणारी ही कोन दाबेली खाण्यासाठी खवय्ये याठिकाणी आवर्जून येतात. या स्टॉलचे मालक ब्रिजेश गुप्ता गेल्या 25 वर्षांपासून या ठिकाणी दाबेली विकत आहेत.
advertisement
'या' टर्किश डेजर्टची चवच न्यारी; एकदा खाल तर म्हणालं लय भारी Video
गुजरातमध्ये पाहिली होती कोन दाबेली
ब्रिजेश गुप्ता यांनी कोन दाबेली हा प्रकार गुजरातमध्ये बघितला होता. आपणही काहीतरी युनिक करायला हवं या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या स्टॉलवर देखील कोन दाबेली विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे कोन दाबेलीसाठी लागणारा कोन हे ब्रिजेश गुप्ता स्वतः घरी तयार करतात. मैद्यापासून तयार केलेला हा कोन चवीला कुरकुरीत पण दाबेलीमुळे आणखीनच चविष्ट लागतो. हा कोन आकाराने अगदी आईस्क्रीम कोन प्रमाणेच असतो. त्या कोनमध्ये भरपूर दाबेली घालून त्यावर शेव घातली जाते.
दरम्यान, ही युनिक डिश कोन दाबेली खाण्यासाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील खवय्ये या ठिकाणी गर्दी करतात, अशी माहिती ब्रिजेश गुप्ता यांनी दिली आहे.